माझ्या किंवा माझ्या पत्नीचं बरं-वाईट झालं तर…, प्रसाद वेदपाठकच्या पोस्टने उडाली सर्वत्र खळबळ

Prasad Vedpathak Controversy | माझ्या किंवा माझ्या पत्नीचं बरं-वाईट झालं तर..., अकाऊंट्स अचानक सस्पेंड झाल्यानंतर प्रसादने कोणाला ठरवलं जबाबदार..., सध्या सर्वत्र प्रसाद याच्या पोस्टची चर्चा.

माझ्या किंवा माझ्या पत्नीचं बरं-वाईट झालं तर..., प्रसाद वेदपाठकच्या पोस्टने उडाली सर्वत्र खळबळ
Prasad Vedpathak
| Updated on: Feb 17, 2026 | 1:08 PM

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारे मराठी इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांचं अकाउंट ‘प्रसिका’ (Prasika) या नावानं ओळखले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. प्रसाद आणि दीपिका यांचं अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर दोघांच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केली आहे. अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर आता प्रसाद याने एक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या प्रसाद वेदपाठक याचं ट्विट व्हायरल होत आहे… अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद याने सोशल मीडियाला तंबी दिली आहे. प्रसाद याच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहे.

प्रसाद याने स्वतःचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये प्रसाद म्हणतो, ‘आम्ही आजवर कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केलेलं नाही. असं असून सुद्धा आमच्या सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स अचानक गायब झाली आहेत. ही आमच्या 10 वर्षांची मेहनत आहे…. जी एका रात्रीत आमच्याकडून हिरावून घेण्यात आली आहे…’ सध्या सर्वत्र प्रसाद याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे…

प्रसाद आणि दीपिरा यांच्या सस्पेंड झाल्यानंतर अकाउंटबद्दल सांगायचं झालं तर, कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता ‘प्रसिक’ हे सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून डिजिटल जगात दीपिका आणि प्रसाद सक्रिय आहेत. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, प्रसाद याने एक्सवर एक पोस्ट देखील केली आहे.

 

 

प्रसाद एक्सवर पोस्ट करत म्हणाला, ‘जर माझ्या किंवा माझ्या पत्नीचं काही बरं वाईट झालं तर, याला फक्त आणि फक्त सोशल मीडियार जबाबदार असेल…’ अशी पोस्ट प्रसाद याने केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांचे सर्व अकाऊंट्स अचानक सस्पेंड का करण्यात आले याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु प्रसाद आणि दीपिकाने त्यांचे सर्व अकाऊंट्स पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. ‘प्रसिका’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीचे खास जेवण बनवतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Follow Us