
Prashant Tamang : ‘इंडियन आयडल’ विजेता आणि अभिनेता प्रशांत तमांग याने वयाच्या 43 व्या अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी दिल्लीतल्या राहत्या घरात प्रशांत बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला तातडीने नवी दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयात दाखल केलं असता सकाळी 9 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर अभिनेत्याचं निधन झालं. 4 जानेवारी 1983 मध्ये अभिनेत्याचा जन्म झाला. तर 11 जानेवारी 2026 मध्ये प्रशांत याने अखेरचा श्वास घेतला. प्रशांत यांच्या निधनानंतर पत्नी आणि मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रात्री कुटुंबासोबत असताना प्रशांत तमांग याचा मृत्यू झाला. पण मृत्यू आधी प्रशांत याने बायको आणि मुलीची संपूर्ण सोय केली आहे. त्याच्या नंतर देखील दोघींना कशाचीच कमतरता भासणार नाही, यासाठी मोठी संपत्ती त्याने त्यांच्या कुटुंबासाठी मागे ठेवली आहे. प्रशांत यांच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अधिकृत आकडा समोर आला नाही. पण त्याची संपत्ती कोट्यवधींमध्ये आहे.. असं सांगितलं जात आहे… त्याने संपूर्ण संपत्ती पत्नी आणि मुलीसाठी मागे ठेवली आहे.
प्रशांत याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पोलिसांत कमा करत असताना देखील, संगीतावर असलेलं प्रेम त्याने कमी होऊ दिलं नाही. तो स्थानिक बँड आणि ऑर्केस्ट्रासोबत गायला लागला आणि हळूहळू त्याच्या परिसरात लोकप्रिय झाला. एवढंच नाही तर, मित्रांनी अभिनेत्याला इंडियन आयडलसाठी ऑडिशन देण्यास सांगितलं… त्यानंतर त्यांच्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आणि प्रशांत शोचा विजेते ठरला.
लोकप्रितेसाठी प्रशांत याने अभिनयात पदार्पण केलं. 2009 मध्ये त्याने नेपाळी सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता प्रशात अभिनेता सलमान खान स्टारर ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमात दिसणार आहे. … सिनेमा 17 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
प्रशांत याच्या कुटुंबात त्याची आजी, आई, बहीण अर्चना, पत्नी गीता थापा आणि मुलगी आरिया यांचा समावेश आहे. गीता ही माजी एअर होस्टेस आहे. दोघांची पहिली भेट विमानात झाली आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं.