प्रशांत तमांग याच्या निधनानंतर खळबळ… पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय? बायको म्हणाली…
2025 मध्ये अनेक दिग्गजांचं निधन झालं. तर आता वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध अभिनेता आणि गायक प्रशांत तमांग याचं अचानक निधन झालं आहे. ज्यामुळे त्याच्या कुटुंबियांमध्ये आणि चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.. आता त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टबद्दल माहिती समोर आली आहे.

2026 या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध अभिनेता आणि गायकाचं निधन झालं आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली…. अभिनेत्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोतचात अभिनेत्याचं निधन झालं. स्ट्रोकमुळे अभिनेत्याचं निधन झालं असं सांगण्यात येत आहे… ज्या अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग आहे.. प्रशांत याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवारी सकाळी दिल्लीतल्या राहत्या घरात प्रशांत बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला तातडीने नवी दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयात दाखल केलं असता सकाळी 9 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला माता चानन देवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी प्रशांत याला मृत घोषित केलं. आता आम्हाला प्रशांत याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे… त्यानंतर काही बोलता येईल… असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिस उपायुक्त अभिमन्यू पोसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 3.10 वा. माता चनन देवी रुग्णालयातून एक एमएलसी मिळाली, रघू नगर येथे राहणाऱ्या प्रशांत तमांग याला रुग्णालायत मृत घोषित करण्यात आलं आहे. त्यानंतर एक अधिकारी घटनास्थळी गेले आणि एमएलसी घेतली… आता प्रशांत याच्या घरातून पुरावे गोळा करण्याचं काम सुरु आहे.
प्रशांत तमांग याची पत्नी काय म्हणाली?
प्रशांत तमांग याचा मृतदेह डीडीयू रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, ज्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. बायको आणि मुलगी अभिनेत्यासोबत होती. अभिनेत्याच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. जोपर्यंत फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट मिळत नाही. तोपर्यंत काही बोलता येणार नाही. असं देखील बायकोने सांगितलं आहे.
अभिनेता सलमान खान याच्या सिनेमात दिसणार प्रशात तमांग
2007 मध्ये प्रशांत याने ‘इंडियन आयडल’ साठी ऑडिशन दिलं. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रशांत आता अभिनेता सलमान खान याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमात दिसणार आहे… सिनेमा 17 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
