AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रिती झिंटाची मुंबई हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण तरी काय?

बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा गेल्या काही दिवसांपासून कायद्याच्या प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. आता तर अभिनेत्रीने थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की अभिनेत्री नेमक्या कोणत्या कारणासाठी कोर्टात पोहोचली... घ्या जाणून...

प्रिती झिंटाची मुंबई हायकोर्टात धाव, नेमकं प्रकरण तरी काय?
अभिनेत्री प्रिती झिंटा
| Updated on: Jul 04, 2026 | 9:00 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून गुगल एलसीसी, मेटा आणि अन्य कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मिळाळी होती. कारण तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर करत एआय-जनरेटेड (AI-generated) ‘डीपफेक, फेरफार केलेल्या प्रतिमा, चॅटबॉक्स आणि अन्य डिजिटल सामग्रीचा वापर करून चुकीच्या मर्गाचा त्यांचा उपयोग केला जात होता. या प्रकरणी प्रितीने थेट कोर्टात धाव घेतली. डीप फेकविरोधात प्रीती झिंटाची मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर आक्षेपार्ह सामग्री हटविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सोशल मीडियावरून एआय-निर्मित डीप फेक फोटो आणि मॉर्फ केलेला मजकूर हटवण्यात यावा… असं सांगितलं आहे. न्यायालयाने या याचिकेची शुक्रवारी दखल घेत आक्षेपार्ह सामग्री हटविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे आदेश ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह सर्व पक्षकारांना दिले आहेत.

एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले डीप फेक व्हिडीओ, मॉर्फा छायाचित्रे आणि त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेले चॅटबॉट-शैलीतील संवाद व अन्य सामग्री त्यांच्या परवानगीशिवाय तयार करून विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आल्याचा दावा प्रीती झिंटा हिने कोर्टात केला आहे.

एवढंच नाही तर, संबंधित संकेतस्थळांना अशी सर्व सामग्री तातडीने हटविण्याचे आदेश द्यावेत तसेच भविष्यात त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्याशी संबंधित कोणतीही एआय-निर्मित किंवा मॉर्फा सामग्री प्रसिद्ध करण्यास कायमस्वरूपी मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

एआय द्वारे निर्मित केलेल्या सामग्रीमुळे वाढली चिंता

एआयचा वापर चांगल्या कामासाठी कमी वाईट कामासाठी अधिक होताना दिसत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवाप वाढला आहे. आयच्या मदतीने प्रसिद्धी झोतात असलेल्या, सेलिब्रिटींची संमती नसताना त्यांची हुबेहूब नक्कल करणारे ‘डीपफेक’ व्हिडिओ, डिजिटल पद्धतीने फेरफार केलेल्या प्रतिमा आणि AI-निर्मित व्यक्तिमत्त्वे तयार केली जातात.

याबाबत जगभरात चिंता वाढत असतानाच ही बातमी समोर आली आहे. ‘जनरेटिव्ह एआय’च्या (Generative AI) युगात आपल्या वैयक्तिक हक्कांचे आणि डिजिटल ओळखीचे संरक्षण करू पाहणाऱ्या सेलिब्रिटींच्या कायदेशीर खटल्यांच्या वाढत्या यादीत झिंटा हिने दाखल केलेल्या खटल्याची भर पडली आहे. याआधी देखील अनेक सेलिब्रिटींनी यावर आक्षेप घेतला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा