AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

अभिनेत्री प्रीती झिंटा आणि दिवंगत चित्रपट निर्माते कमल अमरोही यांचे पुत्र शानदार अमरोही यांच्यातील २ कोटी रुपयांच्या कर्जाचा जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. प्रीती झिंटांनी दिलेली रक्कम परत मिळावी, यासाठी कायदेशीर दावा केला होता. चला तर मग हे प्रकरणं नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 8:23 PM
Share

‘पाकीजा’ आणि ‘मुघल-ए-आझम’ सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते कमल अमरोही यांच्या कुटुंबावर कठीण काळ आला होता. तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात पुढे केल्याचे सांगितले जातंय. प्रीती झिंटाने कमल अमरोही यांचा मुलगा शानदार अमरोही यांना 2 कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात दिले होते. मात्र, हे पैसे अद्याप परत करण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या जुन्या आर्थिक व्यवहाराची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. आता कमल अमरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या भावावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भूमिका मांडताना प्रीती झिंटाने दिलेल्या पैशांचा ठोस पुरावा काय आहे, असा सवाल केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जुन्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र या प्रकरणातील आरोप आणि दावे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने त्याबाबत अंतिम निष्कर्ष निघालेला नाही.

ताजदार अमरोही यांनी विकी लालवाणी यांच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रीती झिंटाने शानदार अमरोही यांना पैसे दिल्याचा दावा केला असून आता ती रक्कम परत मागत आहे.

ताजदार यांनी प्रश्न उपस्थित करत विचारले की, शानदार जिवंत असताना पैशांची मागणी का करण्यात आली नाही? त्यांच्या निधनानंतरच हा दावा का करण्यात आला? तसेच, जर प्रत्यक्ष पैसे दिले असतील, तर त्यासंबंधी पावती, व्यवहाराची नोंद किंवा अन्य कोणता पुरावा आहे का, असाही त्यांनी सवाल केला. त्यांनी पुढे “पैसे नेमके कोणाला दिले?” असा प्रश्न उपस्थित करत या दाव्याच्या पुराव्याबाबत शंका व्यक्त केली.

२ कोटी रुपयांच्या कर्जाव्यतिरिक्त प्रीती झिंटा आणि शानदार अमरोही यांच्यात सुमारे 600 कोटी रुपयांच्या मालमत्तेवरूनही वाद असल्याचे सांगितले जाते. शानदार अमरोही यांनी एकदा प्रीती झिंटाला आपली दत्तक मुलगी म्हटल्याचा उल्लेखही या प्रकरणात केला जातो.

दरम्यान शानदार अमरोही आपल्या मालमत्तेतील काही हिस्सा प्रीती झिंटाच्या नावावर करण्यासाठी मृत्युपत्र तयार करणार असल्याची चर्चा होती. तसेच तिला ‘महल पिक्चर्स’ची संचालक बनवण्याची योजना असल्याचेही दावे करण्यात आले होते. मात्र प्रीती झिंटाने हे दावे नाकारले होते.

600 कोटींच्या मालमत्तेच्या दाव्यावर ताजदार अमरोहींचे स्पष्टीकरण

याच संभाषणात ताजदार अमरोही यांनी शानदार अमरोही आणि प्रीती झिंटा यांच्यातील मालमत्तेच्या वादावरही चर्चा केली. 600 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा दावा त्यांनी या मुलाखती दरम्यान फेटाळून लावला.

ताजदार यांच्या म्हणण्यानुसार, कमल स्टुडिओ विकण्याची चर्चा सुरू असताना शानदार यांचा हिस्सा 600 कोटी रुपये असल्याची चर्चा होती आणि हा हिस्सा प्रीती झिंटाला दिला जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात 600 कोटी रुपयांची अशी कोणतीही मालमत्ता अस्तित्वात नव्हती. असे ताजदार यांनी यावेळी सांगितले.

तसेच शानदार अमरोही यांनी प्रीती झिंटाला दत्तक मुलगी घेतले नव्हते, त्यामुळे प्रीतीला मालमत्ता देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

ताजदार यांनी यावेळी हे ही सांगितले की शानदार अमरोही खरंतर प्रिती झिंटाचा चाहता होता आणि तिला अनेकदा महागड्या भेटवस्तू पाठवत असे. त्याने त्या अभिनेत्रीला रेफ्रिजरेटर आणि घड्याळ यांसारख्या मौल्यवान वस्तू भेट दिल्या होत्या. प्रिती झिंटालाही त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हते.

प्रीतीचा दावा काय होता?

शानदार अमरोही यांच्या मृत्यूनंतर प्रीती झिंटाने त्यांना उधार दिलेल्या पैशांची व्याजासहित परतफेड करण्याची मागणी केली. 2013 मध्ये तिने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला, ज्यात तिने म्हटले की, तिने त्यांना 2 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते, भेट किंवा दान म्हणून नाही. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार शानदार अमरोही त्यावेळी आर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करत होते. त्यांनी प्रीतीकडे आर्थिक मदत मागितली होती आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर पैसे परत करण्याचे वचन दिले होते.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ