पाकिस्तानमध्ये जन्मलेला तो भारतीय अभिनेता, आर्मीची ट्रेनिंग सोडून मुंबईत आला, ओळखलं का कोण?

आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला होता. पण फाळणीनंतर ते कुटुंबासोबत भारतात आले. ते आर्मीचे ट्रेंनिंग सोडून पळून आले होते.

पाकिस्तानमध्ये जन्मलेला तो भारतीय अभिनेता, आर्मीची ट्रेनिंग सोडून मुंबईत आला, ओळखलं का कोण?
Prem Nath
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 9:39 AM

हिंदी सिनेमात असे अनेक अभिनेते झाले, ज्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. पण आज आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत, त्यांचा अंदाज नेहमीच सर्वात वेगळा राहिला आहे. कधी हिरो बनून त्यांनी मन जिंकले, तर कधी दमदार व्हिलनच्या भूमिकेत लोकांना आश्चर्यचकित केले. ‘बॉबी’, ‘तिसरी मंझिल’, ‘शोर’, ‘जॉनी मेरा नाम’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांमधील त्यांची भूमिका पाहून सर्वांनी कौतुक केले. हा अभिनेता दुसरा कोणी नसून प्रेम नाथ मल्होत्रा आहेत. आज म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी त्यांची जयंती आहे.

अभिनेत्याचा जन्म पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. सुरुवातीच्या काळात त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुलगा देशसेवेत जावा. त्यामुळे त्यांनी आर्मीत भरती होण्यासाठी ट्रेनिंगही सुरू केली होती. पण त्यांच्या मनात अभिनयाची ज्योत पेटत होती. म्हणून एक दिवस ते शांतपणे आर्मीचे ट्रेनिंग सोडून मुंबईला पळाले.

Loading...

मुंबईत येऊन त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम केले आणि इथूनच त्यांचे नशीब बदलले. मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवताच ते चमकले. पण त्यांचे वैयक्तिक जीवनही कोणत्याही चित्रपट कथेपेक्षा कमी नव्हते. एक काळ असा होता जेव्हा त्यांचे मन सौंदर्याची मल्लिका मधुबाला यांच्यावर जडले होते. दोघांमध्ये जवळीक वाढली, पण जेव्हा त्यांना कळले की मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा त्यांनी एक पाऊल मागे घेतले. त्यांनी आपल्या प्रेमाचा त्याग केला.

प्रेम नाथ यांचे कपूर कुटुंबासोबतचे नाते

प्रेम नाथ यांचे कपूर घराण्याशीही खूप खास आणि खोल नाते होते. त्यांची बहिण कृष्णा मल्होत्रा यांचा विवाह हिंदी सिनेमाचे शोमॅन राज कपूर यांच्याशी झाला होता. या नात्याने प्रेम नाथ, ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांचे मामा होते. प्रेम नाथ यांनी आपल्या मेहनतीने आणि उत्साहाने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान मिळवले. हिरो पासून व्हिलन आणि कॅरेक्टर रोलपर्यंत… त्यांनी प्रत्येक भूमिकेला पडद्यावर जिवंत केले. त्यांचे चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से आजही सिनेमाप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहेत.

इंडस्ट्री सोडून कुठे गेले होते?

करिअर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात असाही काळ आला, जेव्हा त्यांचे चित्रपट सतत फ्लॉप होऊ लागले. यामुळे ते इतके निराश झाले की त्यांनी चित्रपट इंडस्ट्री सोडली. ते धार्मिकही होते. पण जेव्हा करिअर खाली जाऊ लागले, तेव्हा त्यांनी सर्वकाही सोडून संन्यास घेतला आणि हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांत शांती शोधत निघाले. मात्र, काही काळानंतर त्यांनी पुन्हा सिनेमाच्या जगात जोरदार वापसी केली होती. ३ नोव्हेंबर १९९२ रोजी वयाच्या ६५ वर्षी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. खरे तर प्रेम नाथ हे अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांत काम केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us