लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाजलेल्या नाटकात झळकणार हा अभिनेता, म्हणाला तुमच्यासारखं जमणार नाही, पण…

अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा 'शांतेचं कार्ट चालू आहे' या लोकप्रिय नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून, त्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या गाजलेल्या नाटकात झळकणार हा अभिनेता, म्हणाला तुमच्यासारखं जमणार नाही, पण...
laxmikant berde
| Updated on: Apr 17, 2026 | 1:29 PM

मराठी नाट्य आणि सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रियदर्शन जाधवला ओळखले जाते. प्रियदर्शन जाधव हा उत्तम अभिनेता असण्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शकही आहे. टाईमपास २ या चित्रपटातून प्रियदर्शन जाधव घराघरात पोहोचला. आतापर्यंत त्याने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा प्रियदर्शन जाधव एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शांतेचं कार्ट चालू आहे या मराठी रंगभूमीवर गाजलेल्या विनोदी नाटकात तो भूमिका साकारत आहे. आता याच निमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता प्रियदर्शन जाधवने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने देव्हाऱ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो ठेवत सर्व देवांची पूजा केली आहे. त्याला त्याने एक खास कॅप्शन दिले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे सर लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावरसुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेचं कार्ट चालूच राहील अशी आशा बाळगतो, असे त्याने यात म्हटले आहे.

प्रियदर्शन जाधवची पोस्ट

१९८३ साली शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर आलं आणि अक्षरशः धुमाकूळ घातला या नाटकाने. लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी नयनतारा लाली जोग यांनी त्यांच्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. नाटक तुफान गाजले. श्रीनिवास भणगे लिखित आणि ” प्रकाश बुद्धीसागर ” दिग्दर्शित हे नाटक सुपरहिट ठरलं. बुद्धीसागर काय कमाल करू शकतात ह्या नाटकाने सिद्ध झालं आणि पुढे त्यांनी अनेक सुपरहिट नाटके दिग्दर्शित केली.

आज त्याच नाटकाचा नव्याने प्रयोग होत आहे. 217 प्रयोग केल्यानंतर कोविड मुळे नाटक बंद पडले. आता नाटक पुन्हा नव्या दमाने सुरू होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे इतकं धमाकेदार काम मला करताच येणार नाही पण तरीही जमेल तेवढं उत्तम करायचा प्रयत्न करेन. #लक्ष्मीकांत बेर्डे सर…. लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावर सुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेच कार्ट “चालूच” राहील अशी आशा बाळगतो. बाकी…………….. मजेत ! प्रेक्षकांना नम्र विनंती : खळखळून हसायचं असेल….. तर कार्ट चालूच आहे !, असे प्रियदर्शन जाधव याने म्हटले.

दरम्यान शांतेचं कार्ट चालू आहे या नाटकातून कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या घेतला जात आहे. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

Follow Us