एक पोस्ट शेअर करण्यासाठी ‘प्रियांका चोप्रा’ कमावते तब्बल इतके रूपये !

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत.

एक पोस्ट शेअर करण्यासाठी 'प्रियांका चोप्रा' कमावते तब्बल इतके रूपये !

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव असते. चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इंस्टाग्रामवर प्रियांकाला जवळपास 6 करोड लोक फाॅलो करतात. तुम्हाला माहिती आहे का? प्रियांका एका इंस्टाग्रामवर प्रमोशन पोस्टसाठी किती रूपये घेते, तर प्रियांका एका इंस्टाग्रामवर प्रमोशन पोस्टसाठी तब्बल 1.92 करोड घेते. (Priyanka Chopra takes 1.92 crore to share a post on Instagram)

नुकताच तिने अमेजन प्राइमसोबत दोन वर्षांसाठी करार केला आहे. पॉर्नस्टार मिया खलीफा  हिने ट्विट केलं होत. तिने  ट्विट करून प्रियांका चोप्रावर (Priyanka Chopra) निशाणा साधला होता. तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काय मिसेज जोनस तु याबद्दल काहीच बोलणार नाहीस का? तु गप्प का आहेस मात्र, मिया खलीफा हिच्या या ट्विटवरून तिलाच ट्रोल केलं होतं.

कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्राने ट्विट करून समर्थन केले होते. प्रियांकाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते की, आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. यामधून काहीतरी मार्ग काढावा. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, आणि मिया खलीफा यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

संबंधित बातम्या : 

बॉयफ्रेंड नुपूरसह आमिरची लेक पोहोचली लग्नात, दोघांच्या नात्यावर कुटुंब राजी?

कंगना रनौतने केली ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीशी स्वतःची तुलना, म्हणते…

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !

(Priyanka Chopra takes 1.92 crore to share a post on Instagram)

Published On - 5:47 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI