भांगेत कुंकू, डोक्यावर दुपट्टा; दुर्गा पूजा पंडालमध्ये प्रियकां चोप्राने वेधलं सर्वांच लक्ष; तिच्या एका गोष्टीमुळे होतंय तिचं कौतुक

प्रियांका चोप्राचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  जो दुर्गा पूजेतील आहे. या कार्यक्रमातील तिचा पारंपारिक लूक आणि साधेपणाचं कौतुक होत आहे. प्रियांका चोप्राच्या साधेपणाने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

भांगेत कुंकू, डोक्यावर दुपट्टा; दुर्गा पूजा पंडालमध्ये प्रियकां चोप्राने वेधलं सर्वांच लक्ष; तिच्या एका गोष्टीमुळे होतंय तिचं कौतुक
Priyanka Chopra
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 1:21 PM

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आहे. 29 सप्टेंबर रोजी तिला मुंबई विमानतळावर पाहिले होते. दरम्यान प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिने बॉलिवूड सोडलं असलं किंवा ती भारतात राहत नसली तरी देखील तिने आपली संस्कृती जपल्याचं उदाहरण म्हणजे तिचा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे. त्याबद्दल चाहते देखील तिचं कौतुक करत आहेत.

दुर्गा पूजा कार्यक्रमातील प्रियकांचा व्हिडीओ व्हायरल 

प्रियांकाचा हा व्हिडीओ 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तिला मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमातला आहे. प्रियांका दुर्गा पूजामध्ये सहभागी झाली होती. तिच्या उपस्थितीने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमातील तिच्या साधेपणाचे लोकांकडून कौतुक होत आहे.


डोक्यावर दुपट्टा घेतला अन्

प्रियांका चोप्राने निक जोनासशी लग्न केले आणि परदेशात गेली. तथापि, जेव्हा ती दुर्गा पूजा पंडालमध्ये आली तेव्हा तिने एथनिक पोशाख घातला. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाताना तिने लगेच तिच्या डोक्यावर दुपट्टा घेतला. तिने पुजाऱ्याला तिच्या कपाळावर तिलक लावायला सांगितले आणि लोकांना मोठ्या प्रेमाने अभिवादन केले.


भांगेत कुंकू भरलं,पापाराझींसोबत फोटोही काढले… प्रियांकाचा पारंपारिक अंदाज 

एवढंच नाही तर तिने भांगेत कुंकूही भरलं. तिने प्रवेशद्वारावर तनिषा मुखर्जीला मिठी मारली आणि अयान मुखर्जीशी गप्पा मारलेल्या पाहायला मिळालं. तसेच तिने पापाराझींसोबत फोटोही काढले आणि त्यांना नवरात्री आणि दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. प्रियांका चोप्राच्या या शिष्टाचाराचे तिच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

प्रियांका चोप्राच्या साधेपणाने चाहत्यांना प्रभावित केले आहे.

जेव्हा पुजाऱ्याने तिला प्रसाद दिला तेव्हा प्रियांका चोप्राने तिचा दुपट्टा पसरवून त्यात तो प्रसाद घेतला. ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. काही नेटकऱ्यांनी तिच्या दिसण्यापासून ते तिच्या कपड्यांपर्यंत सर्वांवरच भरभरून कमेंट्स केल्या आहेत. प्रियांकाला पुन्हा एकदा देसी लूकमध्ये पाहून सर्वांनाच छान वाटलं. कार्यक्रमातील प्रियांकाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे आणि तिच्या या साधेपणाचे कौतुकही होत आहे.