
सनी देओलच्या बॉर्डर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. चाहते या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. आज बॉर्डर 2 चित्रपट रिलीज झाला. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपटाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. बॉर्डर 2 चित्रपटाची सुरूवात मोठ्या ग्रहणाने झाली. ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांनाही धक्का बसला. प्रजासत्ताक दिनाला तीन दिवस शिल्लक असताना हा चित्रपट रिलीज करण्यात आला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा असून चित्रपट धमाका करेल, असे बोलले जात आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपटाला ग्रहण लागले असून सकाळचे अनेक शो रद्द करण्यात आले. आता बॉर्डर 2 चित्रपटाचे शो रद्द करण्याचे कारणही पुढे आले. मात्र, पहिल्याच दिवशी प्रेक्षकांमध्ये निराशा बघायला मिळत आहे.
सनी देओलसोबतच वरूण धवन या चित्रपटात धमाका करताना दिसेल. बॉर्डर 2 चित्रपट मोठा रेकॉर्ड तयार करेल असे सांगितले जात असतानाच वाईट बातमी पुढे आली. चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी धक्कादायक प्रकार घडला असून प्रेक्षकांमध्ये मोठी निराशा सध्या बघायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, टेक्निकल कारणांमुळे आज सकाळचे बॉर्डर 2 चे शो रद्द करण्याची वेळ आली. सकाळी 8,9 आणि 10 वाजताचे शो रद्द करण्यात आली.
रिपोर्टनुसार, मॅक्स बोरीवलीमधील बॉर्डर 2 चा पहिला शो रद्द करण्यात आला. शो रद्द करण्याचे कारण प्रिंट्स उशिरा मिळाली, सांगितले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, जास्त करून थिएटरने सकाळचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुठेतरी प्रेक्षकांमध्ये निराशा बघायला मिळाली. कारण कोणत्याही चित्रपटाचा पहिला शो पाहण्याबद्दल लोकांमध्ये क्रेझ असते, तशी तयारी त्यांच्याकडून केली जाते. मात्र, शो रद्द झाल्याने प्रेक्षकांच्या आशेवर पाणी फिरले.
यादरम्यान थिएटरवाल्यांनी सांगितले की, चित्रपट डाऊनलोड झाला की, रीशेड्यूल केले जाईल आणि त्यांना सीट दिले जाईल. फिल्म इन्फॉर्मेशने सांगितले की, फायनल कंटेंट गुरूवारी रात्री उशिरापर्यंत तयार नव्हता. यासोबतच असेही सांगितले जात आहे की, कंटेट अर्ध्या रात्रीपर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती, कंटेटची स्थिती पाहून सकाळचे शो होणार नसल्याचा अंदाज होता. चित्रपटाच्या 192 मिनिटांच्या रनटाईमला बघून चित्रपट स्क्रीनिंगसाठी तयार होण्यासाठी 4 तासांपर्यंत वेळ लागू शकतो, असे सांगितले जात आहे.