बुरख्यातल्या मुली बाजूला होत्या, आपल्या मुली मात्र…, रुचिता सिंगच्या माफीमान्यावर कंगना यांची स्पष्ट भूमिका
'बुरख्यातील मुली बाजूल होत्या, पण आपल्या मुली मात्र...', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे रुचिता सिंह हिने माफी माहितील. यावर भाजप खासदार कंगना राणौत यांनी समाजातील वास्तव सांगत राक्षसी विचारसरणीच्या व्यक्तींवर टीका केली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं. या आंदोलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आणि त्यांच्या आई विरोधात घोषणाबाजी आणि अपशब्दांचा वापर करण्यात आला… दरम्यान, रुचिता सिंह नावाच्या एका मुलीने मोदी यांना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाचे वकील स्मृती सिंह चंदेल यांनी रुचिता हिच्या विरोधात FIR दाखल केला.
अडचणीत अडकल्यानंतर रुचिता हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि देशाची माफी देखील माफी देखील मागितली. यावर आता भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी स्पष्ट भू्मिका मांडली आहे. ‘स्कार्फ किंवा बुरखा घातलेल्या मुलींना आंदोलन केलं नाही. पण आपल्या मुली सहज कोणाच्याही प्रभावाखाली येतात. असं का? एक समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत…’, असं कंगना म्हणाल्या.
मुलीच्या माफिनाम्याच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगना म्हणाल्या, ‘ती फक्त 15 वर्षांची मुलगी आहे. ती स्वतः म्हणत आहे की, तिने तिच्या आयुष्यात कधीच मोदींच्या विरोधात कोणती पोस्ट केलेली नाही. पण त्या दिवशी तिचे मित्र तिला तेथे घेऊन गेले आणि मोदी यांच्या विरोधात बोलण्यास सांगितलं… त्यामुळे आपल्याला एकत्र येऊल या राक्षसी विचारसरणीच्या लोकांपासून आपल्या मुलींचा बचाव केला पाहिजे…’
पुढे कंगना म्हणाल्या, ‘एक गोष्ट लक्षात घ्या स्कार्फ किंवा बुरखा घालेल्या मुलींनी प्रदर्शन केलं नाही. पण आपल्या मुली सहज लोकांच्या जाळ्यात अडकतात… असं का? एक समाज म्हणून आपण कुठेतरी मागे पडत आहोत… आपल्याला विचार केला पाहजे… आपल्या भावनांचा तपास केला पाहिजे आणि आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे…’, असं देखील कंगना राणौत म्हणाल…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागत काय म्हणाली रुचिता…
सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडीओ पोस्ट करत रुचिता म्हणाली, ‘मी माझ्या मित्रांसोबत कनॉट प्लेस येथे गेलेली. तेथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं, तेथे अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते… त्या लोकांच्या प्रभावाखाली मी देखील वाईट शब्दांचा वापर केला… मी जे काही केलं, त्यासाठी मी माफीच्या लायक नाही. मी फार वाईट शब्द वापरले आहेत. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे… त्यानंतर मी असं कधीच करणार नाही… मी पूर्ण देशाची माफी मागते…’, असं रुचिता म्हणाली.