AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला इतकी लाज वाटतीये की…’, पंतप्रधान मोदींना नको ते बोलणारी रुचिता अखेर झुकली, व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नको ते बोलणं 15 वर्षीय रुचिताला पडलं महागात, पोलीस तिच्या घरी पोहोचले पण..., अखेर व्हिडीओ पोस्ट करत म्हणते, 'मला इतकी लाज वाटतीये की...', पंतप्रधना मोदी यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर रुचिताने मागितली माफी...

'मला इतकी लाज वाटतीये की...', पंतप्रधान मोदींना नको ते बोलणारी रुचिता अखेर झुकली, व्हिडीओ व्हायरल
PM Narendra Modi
| Updated on: Aug 01, 2026 | 11:13 AM
Share

दिल्ली येथील जंतरमंतर येथे कॉक्रेच जनता पार्टीने 20 जुलै रोजी संसदेपर्यंत मोर्चा काढला… केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि शिक्षण व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची मागणी तर जेन झी रस्त्यावर उतरले. आंदोलनाला देशव्यापी स्वरुप प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नारेबाजी केली आणि अपशब्द देखील वापरले. अशात रुचिता सिंह नावाच्या एका मुलीने मोदी यांना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, सुप्रीम कोर्टाचे वकील स्मृती सिंह चंदेल यांनी रुचिता हिच्या विरोधात FIR दाखल केला. पोलीस जेव्हा सेक्टर 18 स्थित रुचिताच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा ती घरी नव्हती… दरम्यान, शुक्रवारी रात्री रुचिता हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि दोन्ही हात जोडून भारतीयांची माफी मागितली… व्हिडीओमध्ये तिने असा देखील दावा केला की, ती फक्त 15 वर्षांची आहे.

व्हिडीओ पोस्ट करत रुचिता म्हणाली, ‘मी माझ्या मित्रांसोबत कनॉट प्लेस येथे गेलेली. तेथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं, तेथे अनेक जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते… त्या लोकांच्या प्रभावाखाली मी देखील वाईट शब्दांचा वापर केला… मी फक्त 15 वर्षांची आहे… मी जे काही केलं, त्यासाठी मी माफीच्या लायक नाही. मी फार वाईट शब्द वापरले आहेत. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे… त्यानंतर मी असं कधीच करणार नाही… मी पूर्ण देशाची माफी मागते… मला आता इतकी लाज वाटत आहे की, मी माझी नजर देखील वर उचलू शकत नाही. कृपया मला माफ करा…’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रुचिता हिची चर्चा रंगली आहे.

ब्यूटी पार्ललमध्ये रुचिता करते काम

सांगायचं झालं तर, यापूर्वी रुचिकाच्या आईने नोएडा पोलीस ठाण्यात पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर करून आपल्या मुलीला माफ करण्याची विनंती केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका ही हरियाणातील फरिदाबादची रहिवासी आहे. तिने या वर्षीच्या जानेवारी महिन्यात नोएडामध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता आणि ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्या मुलांनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती त्यांना आपण माफ केल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. ती मुले भरकटलेली आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणं ही आपली जबाबदारी आहे, असं देखील मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच रुचिका सिंग हिने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद