
Puratawn Film Release : सध्या Puratawn या बंगाली सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भूमिका केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमन घोष यांनी केलं असून रितुपर्णा सेनगुप्ता, इंद्रनील सेनगुप्ता यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. दरम्यान, याच चित्रपटाच्या स्पेशनल स्क्रिनिंगला प्रसिद्ध अभिनेत्री त्रिधा चौधरी आणि इंद्रनील सेनगुप्ता उपस्थित होते. या दोघांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून सर्वच सिनेरसिकांनी हा चित्रपट सिनेमागृहांत पाहावा, असे आवाहन केले आहे.
त्रिधा चौधरीने Puratawn हा सिनेमा सर्वांनी पाहावा अशी विनंती केली आहे. “मी बंगली आहे. मी या चित्रपटासाठी मी फारच उत्सुक आहे. मी लहानपणापासून शर्मिला टागोर यांना पाहात आले आहे. मला कुणासारखे व्हायचे असेल तर त्या शर्मिला मॅडम आहेत. शर्मिला टागोर यांच्यात काहीतरी विशेष असं आहे. त्या आज या कार्यक्रमात आमच्यासोबत नाहीत. त्या कुठेतरी अन्य ठिकाणी सूटिंगमध्ये व्यग्र आहेत. पण शर्मिला टागोर यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी फारच उत्सुक आहे,” अशा भावना त्रिधा चौधरीने व्यक्त केल्या. तसेच मला वाटतं अनेक दशकांनंतर त्या पुन्हा एकदा बंगाली चित्रपटात दिसणार आहेत. संपूर्ण बंगाल त्यांच्यावर प्रेम करतो, अशी स्तुतीसुमनंदेखील त्रिधाने उधळली.
रितुपर्णा सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता यांनीदेखील या चित्रपटाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “शर्मिला टागोर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असत्या तर फारच छान झाले असते. मात्र त्यांनी आमच्यासोबत या चित्रपटात काम केले हेच आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे,” असे म्हणत निर्मात्या रितुपर्णा सेनगुप्ता यांनी शर्मिला टागोर यांचे आभार मानले. तसेच आज हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे. बंगालमध्ये हा चित्रपट अगोदरच हिट झाला आहे. 50 ते 60 शो हे हाऊसफूल झाले आहेत. आमच्या दिग्दर्शकांनी हा चित्रपट फारच चांगल्या पद्धतीने तयार केला आहे,” असे म्हणत त्यांनी हा चित्रपट सर्वांनी पाहण्याचे आवाहन केले.
“पश्चिम बंगालमध्ये हा चित्रपट 11 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला आहे. बंगालमध्ये या चित्रपटाला फारच चांगला प्रतिसाद मिळत आहेत. आमच्या Puratawn या चित्रपटाचे जवळपास सर्वच शो हाऊसफूल आहेत. आज हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई येथून आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत,” अशी माहिती अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताने दिली.
हा चित्रपट मानवी नात्यांवर भाष्य करणारा आहे. विदेशातही या चित्रपटाची कहाणी लोकांना आवडेल, असाच या त्याचा विषय आहे, असे सांगत त्यांनीही हा चित्रपट सर्वांनी पाहावा अशी विनंती इंद्रनील सेनगुप्ताने यांनी केली.