सर्वांना टोमणे मारणारे राजकुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून…

राजकुमार यांनी अनेक कलाकारांवर टोले लगावले, पण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील या अभिनेत्याबाबत मात्र नेहमी राखला सन्मान; माजी पत्नी सीमा कपूर यांनी सांगितला किस्सा

सर्वांना टोमणे मारणारे राजकुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून...
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 23, 2026 | 4:25 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजकुमार हे त्यांच्या दमदार अभिनया इतकेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जात होते. समोर कोण आहे, किती मोठा स्टार आहे किंवा त्याची किती लोकप्रियता आहे, याचा विचार न करता ते मनातील गोष्ट थेट बोलत असत. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक कलाकार त्यांच्या टोमण्यांचे लक्ष्य ठरले होते. मात्र एक अभिनेता असा होता, ज्याच्याबाबत राज कुमार यांनी कधीही अवमानकारक टिप्पणी केली नाही. तो अभिनेता म्हणजे ओम पुरी. यामागचे कारण ओम पुरी यांच्या माजी पत्नी सीमा कपूर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत उलगडले आहे.

सीमा कपूर यांनी सांगितले की, पूर्वी चित्रपटसृष्टीत नवीन कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा मोठे कलाकार किंवा नवीन कलाकारांना कमी लेखत असत. त्यांच्या सौंदर्यावर, बोलण्याच्या शैलीवर किंवा अभिनय क्षमतेवर टीका केली जात असे.

ओम पुरी यांनाही त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशा अनेक अनुभवांना सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी कधीही या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ दिला नाही. संघर्षाच्या काळात आलेल्या अडचणी लक्षात ठेवून त्यांनी पुढे यश मिळाल्यानंतर कोणत्याही कनिष्ठ कलाकाराशी तुच्छतेने वागणे टाळले.

शबाना आझमींची गंमतीशीर टिप्पणी

सीमा कपूर यांनी एक जुना किस्सा सांगताना म्हटले की, एकदा शबाना आझमी यांनी ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांना पाहून विनोदाने विचारले होते, अशी चेहरेपट्टी घेऊन तुम्ही चित्रपटसृष्टीत येण्याचे धाडस कसे केले? ही टिप्पणी विनोदाच्या स्वरूपात करण्यात आली होती. मात्र त्या काळात ओम पुरी यांना त्यांच्या दिसण्यावरून अनेकदा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागत असत. तरीही त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आणि रूपापेक्षा प्रतिभा महत्त्वाची असते हे सिद्ध करून दाखवले.

जीनत अमान यांच्याबाबतही केली होती टिप्पणी

सीमा कपूर यांनी सांगितले की, राज कुमार अनेक कलाकारांवर त्यांच्या खास शैलीत टिप्पणी करत असत. एकदा त्यांनी झीनत अमान यांच्याबाबतही केलेल्या वक्तव्याची मोठी चर्चा रंगली होती.

त्यांच्या स्पष्ट आणि कधीकधी अस्वस्थ करणाऱ्या बोलण्यामुळे अनेक कलाकार अडचणीत येत असत. मात्र ओम पुरी यांच्या बाबतीत त्यांनी कायम आदराची भूमिका घेतली. त्यामुळे हा किस्सा आजही बॉलिवूडमधील एक वेगळा आणि लक्षवेधी प्रसंग म्हणून ओळखला जातो.

Follow Us