Radhika Aapte: आलिया, दिपीकामुळे राधिका आपटेला करावं लागतंय ‘तसल्या’ चित्रपटांत काम, नेमकं काय म्हणाली?
Radhika Aapte Akka Series: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने नुकतेच दिपीका पादुकोण आणि आलिया भट्टचा उल्लेख करत एक विधान केले आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

Radhika Aapte News: अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असते. तिने आपल्या अभिनयाने कमी कालावधीत चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ति अक्का वेबसिरीजमुळे चर्चेत आली आहे. तिच्या ‘अक्का’ या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ती अनेक मुलाखती देत आहे. या मुलाखतीत तिने एक विधान केले ज्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
एका मुलाखतीत तिने सांगितले की, “हिंदी चित्रपटसृष्टीत बहुतेक अभिनेत्रींना पुरुष नायकांसोबतच चित्रपटांमध्ये काम करावे लागते. याचे कारण असे की, महिला-प्रधान चित्रपटांना थिएटरमध्ये चांगली ओपनिंग मिळवणे कठीण जाते. एखाद्या महिला-प्रधान चित्रपटात आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी मोठी स्टार असेल तरच तो बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळवू शकतो.”
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, “मी एखादा प्रोजेक्ट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल की ओटीटीवर, यावर निवडत नाही. माझ्यासाठी ते फारसे महत्त्वाचे नाही. चित्रपट कुठे प्रदर्शित होईल हे अनेक व्यावसायिक निर्णयांवर अवलंबून असते. मला फक्त एवढेच हवे आहे की चित्रपट कसातरी प्रदर्शित व्हावा.”
राधिका पुढे म्हणाली की, “बॉक्स ऑफिस डोळ्यासमोर ठेवूनच अभिनेत्रींना पुरुष नायकांसोबत चित्रपटांमध्ये काम करावे लागते. गेल्या काही वर्षांपासून, फक्त थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट पाहून कोणते चित्रपट चालत आहेत आणि कोणते नाहीत, हे ओळखणे कठीण झाले आहे. जर मी एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली, तर तो चित्रपट कितीही चांगला असला तरी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेलच असे नाही. मी आलिया भट्ट किंवा दीपिका पदुकोणसारखी थोडी आहे, ज्यांच्या चित्रपटांकडून किमान चांगल्या ओपनिंगची अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणूनच मला पुरुष नायक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करावे लागते.”
राधिका आपटे ‘अक्का’ या सिरीजमध्ये झळकणार आहे. ही १९८० च्या दशकातील एक गँगस्टर ड्रामा आहे. राधिकासोबत कीर्ती सुरेश देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका ३० ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.