Shehnaaz Gill | अखेर राघव जुयालने सांगितलं शहनाजसोबतच्या नात्याचं सत्य; म्हणाला “मी लग्न केलंय..”

‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये भाग घेत राघवने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने बऱ्याच डान्सिंग शोजचं सूत्रसंचालन केलं. यामध्ये डान्स दिवाने 3 आणि डान्स प्लस 6 यांचा समावेश आहे. याशिवाय त्याने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘बहुत हुआ सम्मान’मध्येही भूमिका साकारली होती.

Shehnaaz Gill | अखेर राघव जुयालने सांगितलं शहनाजसोबतच्या नात्याचं सत्य; म्हणाला मी लग्न केलंय..
Shehnaaz Gill and Raghav Juyal
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2023 | 4:30 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिलने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळाली होती. कोरिओग्राफर आणि डान्सर राघव जुयालनेही यामध्ये सलमानच्या छोट्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राघव आणि शहनाज यांची चांगली मैत्री झाली. या मैत्रीनंतर हळूहळू दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. राघव आणि शहनाज एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांवर आता राघवने उत्तर दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राघवने या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला, “मी आणि शहनाजने एकत्र एकाच चित्रपटात काम केलं आणि ही गोष्ट फक्त एवढीच आहे. लोक अनेकदा सहकलाकारांबद्दल चर्चा करतात. हे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही एकमेकांना डेट करत नाही. पुढील काही महिन्यांत माझे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की मी लग्न केलंय.. माझ्या कामाशी. सध्या मला सिंगलच राहायचं आहे. माझ्याकडे कोणाला डेट करण्यासाठी किंवा रिलेशनशिपसाठी वेळ नाही.”

‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये भाग घेत राघवने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने बऱ्याच डान्सिंग शोजचं सूत्रसंचालन केलं. यामध्ये डान्स दिवाने 3 आणि डान्स प्लस 6 यांचा समावेश आहे. याशिवाय त्याने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील ‘बहुत हुआ सम्मान’मध्येही भूमिका साकारली होती.

शहनाज गिल ही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. मात्र बिग बॉसमुळे तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात तिचं अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी नाव जोडलं गेलं. या दोघांची मैत्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. म्हणूनच त्यांनी या दोघांच्या जोडीला ‘सिडनाज’ असं नाव दिलं होतं. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज खूप खचली होती. बऱ्याच काळानंतर ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.