
Rahul Gandhi on The Kerala Story 2: अनेक वादग्रस्त परिस्थितीचा सामना केल्यानंतर ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली तर अनेकांनी सिनेमावर टीका केली आहे. फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सिनेमा करत आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सिनेमाबद्दल स्वतःचं मत व्यक्त करत टीका केली आहे. त्यांनी हा सिनेमा प्रोपेगेंडा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी सिनेमावर टीका केली आणि तो समाजात फूट पाडणारा सिनेमा असल्याचं म्हटलं. कुरिक्कनम येथील मारियन कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहिला जात नाही हे चांगलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘द केरल स्टोरी 2’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बरेच लोक केरळची संस्कृती आणि परंपरा योग्यरित्या समजून घेत नाहीत. सिनेमा, टीव्ही आणि माध्यमांचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे… असं देखील राहुल गांधी म्हणाले.
पुढे राहुल गांधी म्हणाले, ‘सिनेमाचा वापर लोकांना कुप्रसिद्ध करण्यासाठी केला आहे… धर्माला वेगळं करणं आणि समाजात दरी निर्माण करण्याचं काम सिनेमा करत आहे… अशा गोष्टी देशासाठी अत्यंत हानिकारक आहेत… अशा गोष्टींच्या प्रचारासाठी मोठी रक्कम खर्च होत आहे… ज्यामुळे देशाच्या सामाजिक प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांनी पुढे म्हटलं की, अशा सिनेमांमुळे देशात असमानता आणि तणाव वाढतो.’
Nobody is really watching The Kerala Story. It shows that the majority of people in this country understand what Kerala is and appreciate its traditions and culture.
Movies, TV, and the media have been weaponised. They are being used precisely to vilify people, to alienate… pic.twitter.com/0qdyP3FKSE
— Congress (@INCIndia) March 6, 2026
‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाची कथा तीन मुलींच्या आयुष्याभोवती फिरत आहे… महिला वेगवेगळ्या राज्यातील असतात आणि कुटुंबियांच्या विरोधात जात मुली मुस्लीम मुलांसोबत लग्न करतात. त्यानंतर त्यांचं बळजबरी धर्मांतरण केलं जातं… सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सिनेमाचा विरोध केला.
अनेक राजकीय नेत्यांनी या सिनेमावर टीका केली. सिनेमात केरळचं नकारात्मक चित्रण केलं आहे आणि ते जातीय द्वेषाला चिथावणी देत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सिनेमावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. पण कोर्टाच्या आदेशानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला… 28 ते 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने आतापर्यंत फक्त 25 कोटींची कमाई केली आहे.