AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijit Dipke Education : अभिजीत दीपकेचं शिक्षण कुठे झालं? पुण्याशी कनेक्शन काय? दिल्लीत कसे पोहोचले? वाचा

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके दिल्लीतील जंतरमंतर आंदोलनानंतर स्वगृही परतले आहेत.दिल्लीतील आंदोलकांवर पोलिसांनी एकीकडे कारवाई सुरु केली असताना या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलला मुलाखत दिली आहे.

Abhijit Dipke Education : अभिजीत दीपकेचं शिक्षण कुठे झालं? पुण्याशी कनेक्शन काय? दिल्लीत कसे पोहोचले? वाचा
abhijit dipke education
| Updated on: Aug 02, 2026 | 8:42 AM
Share

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरुन जन्माला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपर फुटीवरून आंदोलन करीत अखेर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला आहे.जंतरमंतरवरील आंदोलनाने आता अभिजीत दीपके यांच्या विषयी सोशल मीडियात सर्वाधिक सर्च केले जात आहे. जंतरमंतर येथील उपोषण आंदोलन आणि संसदेवरील मोर्चा तसेच लाठीमार यामुळे जेन – झी पिढीबद्दल काही आक्षेप देखील नोंदवले जात आहे. या पार्श्वभूमीवर टीव्ही ९ मराठी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी अभिजीत दीपके यांना बोलते केले आहे.

एक मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा, परदेशात बोस्टन येथे शिक्षण घेण्यास जातो काय ? एक तरुणांची चळवळ उभी करुन दिल्लीच्या तख्ताला झुकवणारे आंदोलन करतो काय ? यामुळे अभिजीत दीपके यांच्याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे. या संदर्भात अभिजीत दीपके यांनी त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीविषयी मुलाखतीत माहिती दिली आहे.

अभिजीत दीपके यावेळी म्हणाले की जर पुन्हा गरज लागली तर आंदोलन करू असे म्हटले आहे. सरकार विद्यार्थ्यांना तंग करत राहिले तर आम्ही आंदोलन करुच अशी भूमिका अभिजीत दीपके यांनी घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की माझा जन्म संभाजीनगरात झाला. मी शाळेत असताना क्रिकेट टीमचा कर्णधार होतो. क्रिकेट मला आवडायचे. मी डिस्ट्रिक्ट लेव्हलपर्यंत क्रिकेट खेळलो आहे. प्रत्येक मुलगा तेंडुलकर होत नाही. शिक्षणाचं बघ आधी..असं घरचे म्हणाले. शिक्षणाचं बघ, तिथूनच पुढे जाशील काही कमावशील. त्यातून तुझं लाइफ सेटल होईल असा तगादा लागला आणि त्यानंतर आपण पुण्यात शिक्षणाला गेल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर मला आपकडून इंटर्नशीपची ऑफर दिसली. त्यांच्यासोबत २०२२ ते २०२३ पर्यंत मी काम केलं. त्यांचं हेल्थ आणि एज्युकेशन मॉडल मला आवडलं. जातीधर्माचं राजकारण न करता त्यांनी काम केलं. ते आवडलं. दिल्लीत दोन ते तीन वर्षे मी हे काम केलं. पण त्यातून घर चालणारं नाही हे लक्षात आले. औरंगाबादेत काम केलं तर भविष्य काय ? तर कंपनीत काम करणं…आमची स्वप्नं छोटी होती. परंतू मुंबई पुण्यातील मुलांची स्वप्न मोठी होती. १० वर्षापूर्वीचं औरंगाबाद वेगळं होतं. डॉक्टर आणि इंजिनियर होऊ एवढंच स्वप्न होतं. पण पुण्यात गेल्यावर एक्सपोजर भेटल्याचे अभिजीत दीपके यांनी यावेळी सांगितले.

त्यानंतर मी आपमध्ये इंटर्नशीप केली. दिल्ली गेलो. तिथे काम करताना मित्र बनले. जे बाहेरून शिकून आले होते. किंवा जाणारे होते. त्यामुळे वाटलं आपणही बाहेर जावं. त्यानंतर मला पैसे मिळत नव्हते. पगार नव्हता. वाटलं आपण लाइफचं पाहिलं पाहिजे. घरच्यांनाही वाटत होते. मग आपण विदेशात शिकायला गेलो. बोस्टन विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली. लोन काढलं. दोन वर्षे तिथे होतो. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. परत आपण मायदेशी आल्याचे अभिजीत यांनी सांगितले.

आता आम आदमी पक्षाशी माझा संबंध नाही. कॉकरोच जनता पार्टीचाही संबंध नाही. पण आपमंध्ये माझे खूप मित्र आहेत. त्यांच्या संपर्कात मी आहे. पण पार्टीशी काही संबंध नाही. २०२२ मध्ये ते सर्व काम संपलं असेही एका प्रश्नाला उत्तर देताना अभिजीत दीपके यांनी सांगितले.

सुजात आंबेडकर यांचा आरोपावर काय उत्तर ?

सुजात आंबेडकर यांनी अभिजीत संघाचे असल्याचा आरोप केला आहे त्यावर विचारले असता ते म्हणाले की मला त्यांना सांगायचंय तुम्ही सर्व जण एकत्र बसा. तुम्ही ठरवा. माझ्या मागे कोण आहे ? मी कुणाची बी टीम आहे. तुम्ही एकत्र बसून ठरवा. मला सांगा. मी मग उत्तर देतो असे उत्तर अभिजीत यांनी सुजात आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर यावेळी दिले आहे.

तुम्ही स्वत: तुमचे हिरो बना

माझा कोणत्याच पक्षाकडे कल नाही. स्वतंत्र राहा असंच जेन झींना सांगेल. राजकीय लोकांमध्ये हिरो बघू नका. तुम्ही इतरांना मोठं कराल तर ते तुमची इज्जत ठेवणार नाही. तुम्ही स्वत: तुमचे हिरो बना. राजकारणी, क्रिकेटर आणि कलाकारांमध्ये हिरो पाहू नका असा माझा सल्ला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो…

आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल. त्या शिवाय आपण राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो. पेट्रोलच्या किंमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किंमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात आय एम ए पॉलिटिकल, त्यांना सांगतो तुम्ही पॉलिटिकल नाही. तुम्ही इग्नोरंट आहे. मी राजकीय आहे. मी क्लिअरली सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या मध्ये राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा ऑप्शन घेतला आहे. आमचा स्टँड हा मुद्द्यांवर असेल असेही अभिजीत दीपके यावेळी म्हणाले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल