‘भूल चूक माफ’चे निर्माते मोठ्या अडचणीत, ‘तो’ निर्णय महागात पडला, आता काय होणार?

Bhool Chuk Maaf: अभिनेता राज कुमार राव स्टारर 'भूल चूक माफ' सिनेमाच्या निर्मात्यांच्या अडचणीत मोठी वाढ, 'तो' एक निर्णय पडला महागात.. पुढे काय होणार...? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या सिनेमाची चर्चा...

भूल चूक माफचे निर्माते मोठ्या अडचणीत, तो निर्णय महागात पडला, आता काय होणार?
फाईल फोटो
| Updated on: May 11, 2025 | 9:30 AM

Bhool Chuk Maaf: अभिनेता राज कुमार राव याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण आता अभिनेत्याचा ‘भूल चूक माफ’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘मॅडॉक फिल्म्स’ या कंपनीने राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या आगामी ‘भूल चुक माफ’ सिनेमाबाबत एक निर्णय घेतला, जो आता त्यांना महागात पडताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीव्हीआर-आयनॉक्सने या प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध 60 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे.
‘भूल चूक माफ’ सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल संबंधित प्रकरण आहे. 9 मे रोजी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण सिनेमाचं प्रदर्शित निर्मात्यांना स्थगित करत दिग्दर्शकांना सिनेमा थेट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सचं नुकसान झालं आहे… असं कोमल नाहटा यांनी म्हटलं आहे. ज्यामुळे ‘मॅडॉक फिल्म्स’ या कंपनीवर कारवाई सुरु आहे.

 

 

कोमल नाहटा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. 60 कोटींच्या नुकसानभरपाईच्या दाव्यासोबत, त्यांनी पोस्टमध्ये असेही लिहिलं, PVR-INOX नुसार, सिनेमाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग हवी तशी झाली नाही. त्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थिएटरमधून रद्द करण्यात आलं. पण, भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा दावा मॅडॉक कंपनीने केला आहे.

आता या प्रकरणात पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा सिनेमा काही दिवसांतच ओटीटीवर येणार आहे. निर्मात्यांनी सिनेमा 16 मे रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. शर्मा दिग्दर्शित ‘भूल चुक माफ’ हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे.

सिनेमात राजकुमार राव आणि वामिका गूब्बी हिच्यासोबत संजय मिश्रा, रघुबीर यादव, जाकिर हुसैन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 8 मे रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निर्मात्यांनी सांगितलं सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होईल.