29 वर्षांत इतकी बदलली ‘परदेसी परदेसी’ गर्ल; ‘राजा हिंदुस्तानी’मधील अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

'राजा हिंदुस्तानी' या गाजलेल्या चित्रपटातील 'परदेसी परदेसी' या गाण्यात झळकलेली प्रतिभा सिन्हाने 2000 मध्ये अचानक इंडस्ट्री सोडली होती. आता तब्बल 29 वर्षांनंतर ती समोर आली असून तिला ओळखणंही कठीण झालं आहे. 55 वर्षांच्या प्रतिभाचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे.

| Updated on: May 30, 2025 | 1:25 PM
1 / 7
'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणं तुम्हाला आठवतंय का? या गाण्यात एक अभिनेत्री झळकली होती. एका गाण्यात झळकलेली ही अभिनेत्री त्यातील मुख्य अभिनेत्री करिश्मा कपूरवरही भारी पडली होती. या अभिनेत्रीचं नाव आहे प्रतिभा सिन्हा. ती दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी आहे. हे गाणं इतकं गाजलं होतं, की त्यानंतर प्रतिभाला अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु तिने अचानकच इंडस्ट्री सोडली आणि सर्वांपासून दूर गेली. आता तब्बल 29 वर्षांनंतर ती एका साड्यांच्या प्रदर्शनात दिसली, तेव्हा तिला पाहून सर्वजण थक्क झाले होते. प्रतिभाला आता ओळखणंही कठीण आहे.

2 / 7
प्रतिभा सिन्हाने आईच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. 90 च्या दशकात तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. 1992 मध्ये तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यामध्ये सुजॉय मुखर्जी हिरो होते. परंतु 'राजा हिंदुस्तानी'मधील एका गाण्यामुळे तिला तुफान प्रसिद्धी मिळाली.

3 / 7
'राजा हिंदुस्तानी'मध्ये करिश्मा कपूर आणि आमिर खान मुख्य भूमिकेत होते. परंतु या एका गाण्यात प्रतिभासुद्धा करिश्मावर भारी पडली होती. त्यानंतर प्रतिभाने 'दिल है बेताब', 'पोकिरी राजा', 'दिवाना मस्ताना', 'कोई किसी से कम नहीं', 'जंजीर' आणि 'मिलिट्री राजा' यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

4 / 7
प्रतिभाने 2000 मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आणि लाइमलाइटपासून दूर केली. ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा कोणत्याही समारंभात उपस्थित राहणं टाळत होती. आता 29 वर्षांनंतर मुंबईतील एका साड्यांच्या प्रदर्शनात प्रतिभाला पाहिलं गेलं. याठिकाणी तिने आठ-दहा साड्या खरेदी केल्या. यावेळी तिने तिचं नाव प्रतिभा लोहानी असं सांगितलं. चित्रपटांमध्ये काम कमावण्यापूर्वी ती याच नावाने ओळखली जायची. लोहानी तिच्या वडिलांचं आडनाव आहे. प्रतिभाचे वडील नेपाळमधील मोठे अभिनेते होते.

5 / 7
प्रतिभाचं खासगी आयुष्य बरंच वादात होतं. तिचं संगीत दिग्दर्शक नदीम सैफीसोबत रिलेशनशिप होतं, अशी चर्चा होती. नदीम हे प्रतिभाची आई माला सिन्हा अजिबात आवडायचे नाहीत.

6 / 7
माला सिन्हा या नात्याच्या विरोधात होत्या. कारण नदीम सैफ दुसऱ्या धर्माचे होते आणि ते विवाहित होते. प्रतिभा आणि नदीम यांच्यात दुरावा यावा यासाठी माला सिन्हा यांनी अनेक प्रत्यत्न केल्याचं म्हटलं जातं आणि त्यात त्या यशस्वीसुद्धा झाल्या.

7 / 7
अचानक एका मुलाखतीत प्रतिभा म्हणाली होती, "मी नदीमशी लग्न केलं नाही आणि कधी करणारही नाही. मी त्यांच्यावर प्रेम करत नाही." हे ऐकून नदीम यांना मोठा धक्का बसला होता. माला सिन्हा यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा कसा प्रयत्न केला, याविषयी त्यांनी एका मुलाखतीत आरोप केले होते.