VIDEO | ‘लागिरं झालं जी’ फेम अज्याचा कपल डान्स, ती अभिनेत्री कोण?

'राजा राणीची गं जोडी' या मालिकेत संजीवनीच्या बेस्ट फ्रेण्डची अर्थात मोनाची भूमिका श्वेता खरात साकारत आहे. (Shweta Rajan Kharat Nitish Chavan)

VIDEO | 'लागिरं झालं जी' फेम अज्याचा कपल डान्स, ती अभिनेत्री कोण?
Shweta Rajan Kharat, Nitish Chavan

मुंबई : ‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagira Jhala Ji) मालिकेतील अज्या अर्थात अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. डान्सची आवड असल्यामुळे नितीश कायम आपले व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना खुश करतो. बऱ्याच व्हिडीओमध्ये एक तरुणी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसते. ही अभिनेत्री कोण आहे, याची चर्चा फॉलोअर्समध्ये रंगली आहे. तर ती कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) या मालिकेतील मोना अर्थात श्वेता राजन खरात (Shweta Rajan Kharat) आहे (Raja Ranichi Ga Jodi Fame Marathi Actress Shweta Rajan Kharat Dance Video with Lagira Jhala Ji fame Marathi Actor Nitish Chavan)

‘राजा राणीची गं जोडी’मधील मोना

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत संजीवनीच्या बेस्ट फ्रेण्डची अर्थात मोनाची भूमिका श्वेता साकारत आहे. या भूमिकेसाठी तिचं चांगलंच कौतुक होत आहे. अभिनेत्री श्वेता खरातने इन्स्टाग्रामवर श्वेता राजन असं हँडल नेम ठेवलं आहे. श्वेताही आपले डान्स व्हिडीओ आणि फोटोशूट शेअर करत चर्चेत असते. श्वेताने नुकतंच ‘घेतला वसा टाकू नको’ मालिकेतील भगवान शंकराच्या पौराणिक कथेत महालक्ष्मीची भूमिका केली होती.

स्थानिक कलाकारांना व्यासपीठ

‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेचं शूटिंग साताऱ्यात होतं. या मालिकेनिमित्त अनेक स्थानिक कलाकारांना संधी मिळाली. श्वेताही त्यातील एक. ती साताऱ्यात राहूनच अभ्यास सांभाळत ऑडिशन्स देत होती. अशातच ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेसाठी तिने ऑडिशन दिली आणि सिलेक्शन झालं. ‘राजा राणीची…’ मालिकेच्या प्रोमोपासूनच श्वेताला प्रसिद्ध मिळाली. टॉक असा आवाज काढणाऱ्या संजीवनी (शिवानी सोनार) सोबत तिची लाजरीबुजरी मैत्रीण म्हणून श्वेताला चांगलीच ओळख मिळाली. आताही मालिकेतील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

नितीश-श्वेताची जुनी मैत्री

लागिरं झालं जी मालिकेचं चित्रिकरणही साताऱ्यात व्हायचं. या मालिकेच्या वेळीही अज्याची भूमिका करणारा नितीश चव्हाण, शितली साकारणारी शिवानी बावकर अशा अनेक स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळालं. नितीशप्रमाणेच श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे.
नितीश आणि श्वेता हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. नितीशच्या टिकटॉक व्हिडीओमध्येही श्वेताचं दर्शन चाहत्यांना घडायचं. नितीश आणि श्वेता यांचं अफेअर असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे, मात्र त्यावर स्पष्ट कोणीच बोललेलं नाही. (Shweta Rajan Kharat Nitish Chavan)

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagwan Nitish (@nitish__chavan)

संबंधित बातम्या :

Mothers Day निमित्त सासूबाईंचाही फोटो, जेनेलिया देशमुखची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Video | ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना…’, कीर्तीचा हा डान्सिंग अंदाज पाहून चाहतेही म्हणाले वा!

(Raja Ranichi Ga Jodi Fame Marathi Actress Shweta Rajan Kharat Dance Video with Lagira Jhala Ji fame Marathi Actor Nitish Chavan)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI