Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’बद्दल अशी चर्चा…, ‘या’ दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमाबद्दल अनेक दावे केले जात आहेत, ज्यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

Raja Shivaji : राजा शिवाजीबद्दल अशी चर्चा..., या दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन
Riteish Deshmukh
| Updated on: May 10, 2026 | 1:03 PM

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हिंदी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेतील सिनेमाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे तर, दुसरीकडे सिनेमाबद्दल अनेक चर्चा देखील सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगल्या आहे. सिनेमाचा बजेट 100 कोटींचा आहे… अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश याने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बजेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रितेश म्हणाला, ‘सिनेमाच्या बजेटबद्दल फक्त निर्मात्यांना माहिती असतं… तर प्रेक्षकांनी फक्त सिनेमाचा आनंद घ्यायला हवा… त्यांनी आकड्यांचा अधिक विचार करायला नको…’

‘जेव्हा आम्ही लहानपणी अमिताभ बच्चन यांचा ‘शोले’ पाहायला जायचो तेव्हा कधीच सिनेमाचा बजेट विचारला नाही. आम्ही फक्त मोठ्या पडद्याचा आनंद घ्यायला जायचो… पण आता सिनेमाची कमाई आणि कलाकारांचं मानधन यावर अधिक चर्चा होऊ लागली आहे. कुठेतरी याचं कारण इंडस्ट्री देखील आहे…’ रितेश याच्या म्हणण्यानुसार, ‘प्रेक्षकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट सिनेमातून आलेला अनुभव असला पाहिजे, सिनेमाचा बजेट नाही…’
एवढंच नाही तर, सिनेमाच्या यशाबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राजा शिवाजी सिनेमा मराठी सिनेविश्वासाठी मोठा रेकॉर्ड ठरत आहे… येत्या काळात दुसऱ्या मराठी सिनेमांनी देखील हा रेकॉर्ड मोडला पाहिजे…’ असं देखील रितेश म्हणाला.

सिनेमाच्या बजेटवर अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, ‘हॉलिवूड सिनेमांमध्ये VFX वर तब्बल 5 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले जातात. भारतीय सिनेमांकडे तितका बजेट नसतो… भारतीय दिग्दर्शक फार कमी कालावधीत सिनेमा तयार करतात आणि प्रेक्षकांना चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. VFX ला योग्य न्याय देण्यासाठी फक्त पैसा नाही तर, वेळ देखील फार लागतो.. असं देखील अभिनेता म्हाणाला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us