AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : 5000 कोटींचा खर्च… वादाच्या भोवऱ्यात ‘राजा शिवाजी’ सिनेमा, अभिषेक बच्चनकडून मोठं वक्तव्य

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त... अभिषेक बच्चन याच्याकडून मोठा खुलासा...

Raja Shivaji : 5000 कोटींचा खर्च... वादाच्या भोवऱ्यात 'राजा शिवाजी' सिनेमा, अभिषेक बच्चनकडून मोठं वक्तव्य
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 10, 2026 | 8:04 AM
Share

Abhishek Bachchan On Raja Shivaji: अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा फक्त प्रेक्षकांमध्येच नाही तर, सोशल मीडियावर देखील रंगली आहे. पण बॉक्स ऑफिसवर चंगली कमाई करणारा ‘राजा शिवाजी’ आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेक जण सिनेमाची तुलना हॉलिवूड सिनेमांशी तरत आहे. सिनेमाबद्दल वाद सुरु असताना, अभिनेता अभिषेक बच्चन याने वादात उडी घेतली आहे. सांगायचं झालंतर, ‘राजा शिवाजी’ सिनेमातील VFX बद्दल वाद सुरु असून अनेकांनी टीका देखील केली आहे. यावर अभिषेक बच्चन याने मोठं वक्तव्य केलं आहे… अभिनेत्याने स्पष्ट म्हटलं आहे की, भारतीय सिनेमांची तुलना हॉलिवूड सिनेमांशी करणं योग्य नाही… कारण दोन्ही सिनेमांच्या बजेटमध्ये फार फरक आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, परंतु त्याच्या व्हीएफएक्समुळे सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली . काहींनी सिनेमाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची तुलना हॉलिवूड सिनेमाशी केली आणि त्यांना कमकुवत म्हटलं. आता अभिषेक बच्चनने या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, ‘हॉलिवूड सिनेमांमध्ये VFX वर तब्बल 5 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले जातात. भारतीय सिनेमांकडे तितका बजेट नसतो… भारतीय दिग्दर्शक फार कमी कालावधीत सिनेमा तयार करतात आणि प्रेक्षकांना चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. VFX ला योग्य न्याय देण्यासाठी फक्त पैसा नाही तर, वेळ देखील फार लागतो,,,, असं देखील अभिषेक बच्चन म्हणाला.

अभिनेता पुढे म्हणाला, ‘सिनेमाची रिलीज डेट आणि बजेट यांमुळे निर्मात्यांना काही निर्णय तात्काळ घ्यावे लागतात.’ विशेषतः रितेश आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचं कौतुक कतर अभिषेक म्हणाला, ‘त्यांचा मर्यादित साधनांसह एवढा मोठा सिनेमा बनवण्याचे प्रयत्न स्वतःच उल्लेखनीय आहेत…’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, रितेश याने सिनेमात महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिषेक बच्चन याने संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारली आहे.

कलाकारांनी नाही घेतलं मानधन

रिपोर्सनुसार, सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सलग दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. नुकताच रितेश याने केलेल्या वक्तव्यानुसार, सिनेमातील 5 कलाकारांनी एकही रुपयांचं मानधन घेतलेलं नाही. अभिनेता सलमान खान, अभिषेक बच्चन, विद्या बालन यांसारख्या सेलिब्रिटींची नावे या यादीत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन