Raja Shivaji : 23 व्या दिवशीही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची जादू कायम, कमावला इतक्या कोटींचा गल्ला
Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 1 मे रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा आजही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जाणून घ्या 23 व्या दिवशी सिनेमाने किती कोटींपर्यंत मजल मारली...

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित सिनेमासाठी चाहते प्रतिक्षेत होते. अशात 1 मे रोजी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि चित्रपटगृहाबाहेर सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आज सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 23 दिवस झाले आहे. पण तरी देखील ‘राजा शिवाजी’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचं दिसून येत आहे. 23 व्या दिवशी म्हणजे शनिवारी देखील सिनेमाने चांगली कमाई केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हिंदी भाषेच्या तुलनेत ‘राजा शिवाजी’ मराठी भाषेत अधिक कमाई करत आहे. एवढंच नाही तर, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने मराठीतील अनेक हीट सिनेमांचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडला आहे.
आतापर्यंत ‘राजा शिवाजी’ सिनेमा किती कोटी रुपये कमावले?
‘राजा शिवाजी’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात जवळपास 52.65 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. दुसऱ्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 24.30 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. 22 व्या दिवशी सिनेमाने 70 लाखांपर्यंत मजल मारली, तर 23 व्या दिवशी सिनेमाने 1.37 कोटी रुपये कमावे. म्हणजे ‘राजा शिवाजी’ सिनेमाने आतापर्यंत 90.77 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात ‘राजा शिवाजी’ 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करून मराठी सिनेविश्वात मोठा इतिहास रचणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘राजा शिवाजी‘ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून सिनेमा दमदार कमाई करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, सगल तिसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने मोठी कमाई केली आहे. आता पुढच्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा बनवण्यासाठी रितेश याला 10 वर्षांचा कालावधी लागला. असं खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं.
‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित आहे. सिनेमात रितेश याने महाराजांची भूमिका साकरली आहे. तर संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, बोमन ईराणी आणि जितेंद्र जोशी यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता सलमान खान याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.