AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच मोठा निर्णय, रितेश देशमुखला..

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' चित्रपट आज, १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची जनहित याचिका फेटाळून लावल्याने रितेशला मोठा दिलासा मिळाला आहे. चित्रपटाच्या नावातून 'छत्रपती' शब्द वगळल्याचा आक्षेप न्यायालयाने अमान्य करत, हा चित्रपट कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशीच मोठा निर्णय, रितेश देशमुखला..
राजा शिवाजी चित्रपटImage Credit source: social media
| Updated on: May 01, 2026 | 8:39 AM
Share

कित्येक वर्ष मेहनत घेत अभिनेता रितेश देशमुख याने त्याचं स्वप्न साकार करत, त्याचं ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट साकार केला. आज (1 मे रोजी) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत असून याच दिवशी रितेशला एक मोठा दिलासाही मिळाला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आज हा चित्रपट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रितेश देशमुखला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी, न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. या चित्रपटाच्या नावातून ‘छत्रपती’ हा शब्द वगळल्यामुळे शिवरायांचा अवमान होतो, असा आरोप करत राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं ही जनहित याचिका फेटाळून लावली. कोर्टाकडून क्लीनचीट मिळाल्याने या चित्रपटाच्या मार्गाताल अडथळा दूर झाला असून रितेश देशमुख आणि चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल लोकांमध्ये णोठी क्रेझ असून तो पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

रितेशला मोठा दिलासा

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेशचा ड्रीम प्रोजेक्ट असून तो गेल्या कित्येक वर्षांपासून या चित्रपटासाठी तयारी, मेहनत करत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन खुद्द रितेनशनेच केले आहे, तर याची निर्मिती ज्योती देशपांडे यांनी केली आहे. 2024 सालीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर सिनेमाचं चित्रिकरण संपल्यानंतर, पिक्चरच्या प्रदर्शनाची तारीख गेल्या वर्षीच जाहीर करण्यात आली होती

मात्र, असं असतानाही ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर चित्रपटाच्या नावातून ‘छत्रपती’ हा शब्द वगळल्यामुळे महाराजांचा अवमान होत असल्याचा आरोप करत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन’ या संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यामुळे शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व कमी होते.’राजा शिवाजी’ हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे असल्याचे एनजीओने याचिकेत म्हटलं होतं.

कोर्टाने फेटाळून लावली याचिका

मात्र सरन्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम आंखर यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावले. ” या याचिकेतून जनहित साधले जात नाही. चित्रपटाचं शीर्षक कोणत्याही प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्जाचा अवमान करणारं नाही. केवळ इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे अशा प्रकारची याचिका करणं चुकीचं आहे ” असे खडे बोल सुनावत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे चित्रपटाच्या नावात आता कोणताही बदल होणार नसून रितेश देशमुखसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

‘राजा शिवाजी’चे दिग्दर्शन करण्यासोबतच रितेशने त्यात अभिनयही केला आहे. तो या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याच्यासह या चित्रपटात जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि संजय दत्त महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे, सलमान खानची देखील या चित्रपटात एक छोटी भूमिका (कॅमिओ) आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण पिक्चर मोठ्आ पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सुक आहेत.

Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?