Raja Shivaji: महाराजांसाठी ‘या’ 5 सेलिब्रिटींनी नाही घेतला एकही रुपया, रितेश देशमुखचा मोठा खुलासा

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण सिनेमातील सेलिब्रिटींनी एकही रुपया घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे... खुद्द रितेश देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे...

Raja Shivaji: महाराजांसाठी या 5 सेलिब्रिटींनी नाही घेतला एकही रुपया, रितेश देशमुखचा मोठा खुलासा
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 05, 2026 | 1:05 PM

Raja Shivaji: अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले असून, सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा लवकरच 50 कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमात रितेश याने महाराजांची भूमिका साकारली आहे. रितेश याच्यासोबतच सिनेमात सलमान खान, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी, विद्या बालन, जिनिलिया यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे… पण तुम्हाला माहितेय या मोठ्या सेलिब्रिटींनी सिनेमात काम करण्यासाठी एकही रुपया घेतलेला नाही.

सिनेमात कोणी – कोणी केलं फ्रिमध्ये काम?

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रितेश देशमुख याने मोठा खुलासा केला आहे. पाच सेलिब्रिटींनी सिनेमात मोफत काम केलं आहे. अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, बोमन ईराणी, जिनिलिया देशमुख यांनी सिनेमासाठी एकही रुपया घेतलेला नाही.. यांनी सिनेमात फ्रिमध्ये काम केलं आहे. तर रितेश याने स्वतः सिनेमाची निर्मिती केली आहे, म्हणून त्याने देखील एकही रुपया घेतलेला नाही.

रितेश स्वतः म्हणाल्यानुसार, अभिषेक बच्चन याने मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे, पूर्ण सिनेमात अभिषेक दिसत नाही. तर सलमान खान याने 5 पेक्षा कमी मिनिटांच्या पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.. ज्यासाठी भाईजानने एकही रुपया घेतला नाही.

याशिवाय, जिनिलिया आणि रितेश एकाच कुटुंबातील आहेत आणि बऱ्याच काळापासून या सिनेमावर काम करत आहेत. त्यामुळे, त्यांनीही पैसे घेतलेले नाहीत. विद्या बालन देखील सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असून तिची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीत तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दरम्यान, बोमन इराणी सिनेमात फक्त दोनदा दिसतात.

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने चार दिवसांत 39 कोटींचा गल्ला जमा केला आहे. पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 11.35 कोटींची कमाई केली. शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सिनेमाने 10.55 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाने 12 कोटींची कमाई केला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने चौथ्या सोमवारी 5 कोटी कमावले. आता येत्या दिवसांत सिनेमा किती कमाई करतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us