AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ला 5 मराठी सिनेमांनी टाकलं मागे, चौथ्या दिवशी इतकेच कमावले

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी देखील सिनेमाने चांगली कमाई केली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'राजा शिवाजी' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी'ला 5 मराठी सिनेमांनी टाकलं मागे, चौथ्या दिवशी इतकेच कमावले
राजा शिवाजी सिनेमा
| Updated on: May 05, 2026 | 8:25 AM
Share

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा बॉक्स ऑफिस बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाने उत्तम कामगिरी केली. सध्या सिनेमाची चर्चा फक्त सोशल मीडियावर नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगलेली आहे. याचाच फायदा बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमाची चौथ्या दिवसाची कमाई?

गेल्या 10 वर्षांपासून मेहनत घेत असलेल्या रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा कधी प्रदर्शित होणार याच प्रतिक्षेत चाहते होते. अखेर सिनेमे रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमाने पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तरी देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिस क आहे. शनिवार – रविवार असल्याने सिनेमाच्या कमाईचा आकडा मोठा होता. पण आता सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावताना दिसत आहे.

सांगायचं झालं तर, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘राजा शिवाजी’ सिनेमाने 11.35 कोटींची कमाई केली. शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सिनेमाने 10.55 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी सिनेमाने 12 कोटींची कमाई केला. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने चौथ्या सोमवारी 5 कोटी कमावले, ज्यामुळे त्याची चार दिवसांची एकूण कमाई 38.11 कोटी झाली आहे.

‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या अवघ्या चार दिवसांत 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ सिनेमा 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला असून सिनेमाने बजेटच्या निम्म्याहून अधिक रक्कम आधीच वसूल केली आहे. आता हा सिनेमा 50 कोटी रुपयांच्या टप्प्याच्या जवळ पोहोचत आहे. सिनेमाची कमाई पाहता, असं दिसत आहे की ‘राजा शिवाजी’ दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा आकडा पार करेल.

मराठीमध्ये सहाव्या क्रमांकावर ‘राजा शिवजी’ सिनेमा

‘राजा शिवाजी’ सिनेमाने 4 मराठी सिनेमांना मागे टाकलं आहे. तर मराठी सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 5 सिनेमानी ‘राजा’ शिवाजी सिनेमाला मागे टाकलं आहे. तर जाणून घ्या मराठीत सर्वात जास्त कमाई करणारे सिनेमे…

मराठीमध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 10 सिनेमांची यादी

सैराट – 80.98 कोटी

बाईपण भारी देवा: 76.92 कोटी

वेड: 61.20 कोटी

नटसम्राट: 42 कोटी

कट्यार कळजात घुसली: 40 कोटी

राजा शिवाजी: 39.50 कोटी (चार दिवसांची कमाई)

पवनखिंड: 37.72 कोटी

लाई भारी: 37 कोटी

टाइमपास: 33 कोटी

क्रांतिज्योती विद्यालय मराठी मध्यम: 28 कोटी

आता येत्या दिवसांमध्ये ‘राजा शिवाजी’ सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी