माधुरी दीक्षित सेकंड ग्रेड हिरॉईन, तिची वेळ संपली… वादग्रस्त टिप्पणीने नवा गदारोळ ?

Rajasthan News : राजस्थान विधानसभेत एप्रोप्रिएशन विधेयकावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते टिकाराम जूली यांनी केलेल्या विधानामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. त्यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षितबद्दल नेमकं काय म्हटलं ?

माधुरी दीक्षित सेकंड ग्रेड हिरॉईन, तिची वेळ संपली... वादग्रस्त टिप्पणीने नवा गदारोळ ?
माधीरी दीक्षितबद्दल वादग्रस्त टिप्पणी
Image Credit source: social media
| Updated on: Mar 13, 2025 | 12:32 PM

राजस्थानमध्ये बुधवारी विधानसभेत विनियोग विधेयकावर चर्चा झाली. मात्र त्यावेळी विरोधी पक्षनेते टिका राम जुली यांनी इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी (आयफा) पुरस्कारांवर होणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकारला सवाल केला. या कार्यक्रमासाठी 100 कोटींहून अधिक खर्च झाला आहे, असे राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले. पण खाटू श्याम जी आणि गोविंद देव जी यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांसाठी पुरेसे बजेट दिले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेली त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल केलेल्या एका विधानामुळे चांगलाच गदारोळ माजला असून नवी ठिणगी पेटू शकते.

IIFA सोहळ्यात सहभागी झालेल्या पाहुण्यांवरूनही टीकाराम जुली यांनी टोला लगावला. या कार्यक्रमात बॉलिवूडचे प्रमुख स्टार्स तर आलेच नव्हते. तिथे कोणीच फर्स्ट ग्रेड कलाकार नव्हते, फक्त सेकंड ग्रेड कलाकार दिसले. “शाहरुख खान हा एकमेव टॉप ग्रेड अभिनेता तिथे होता’, असं ते म्हणाले. मात्र त्यावेळी कोणीतरी माधुरी दीक्षितचं नावं घेतलं असता त्यावर जुली यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. फर्स्ट ग्रेडमध्ये फक्त शाहरुख खान तिथे होता, आजकाल माधुरी दीक्षित ही सुद्धा सेकंड ग्रेडमधील आहे , तिचा काळ आता गेला, तिची वेळ आता संपली’ असे जुली म्हणाले. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

याशिवाय, जुली यांनी गायक सोनू निगमला या कार्यक्रमातून वगळण्यावरही टीका केली, “सोनू निगमला आमंत्रित करायला हवे होते. त्याला महिन्याभरापूर्वी इन्व्हेस्टर समिटला आमंत्रित केले होते, पण आयफाला नाही.” असे ते म्हणाले.

इतके पैसे तर खाटू श्याम आणि गोविंद जी यांच्या मंदिरावरही खर्च झाले नाहीत

टीका राम जुली यांनी भाजवर सडकून टीका केली. “तुम्ही आयफावर 100 कोटींहून अधिक खर्च केलेत, पण खाटू श्याम जी आणि गोविंद देव जी यांच्यासाठी तेवढीच रक्कम दिली नाही. पण, आयफाची फाईल बुलेट ट्रेनप्रमाणे वेगाने पार पडली. तुम्ही आयफामध्ये राजस्थानचा प्रचार केला होता की फक्त कार्यक्रमाचा?” असा थेट सवाल त्यांनी विचारला.

सोनू निगमही नाराज

सोनू निगमने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केल्यावर आयफा पुरस्कारांबाबतचा वाद आणखी वाढला. जयपूर येथे आयोजित आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर जुली यांनी या कार्यक्रमावर टीका केली की, ‘भूल भुलैया 3’ मधील ‘मेरे ढोलना 3.0’ या गाण्यासाठी सोनू निगमला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक श्रेणीमध्ये नामांकन मिळाले नाही. मंगळवारी सोनू निगमने आयफा नामांकनाचा स्क्रीनशॉट शेअर करून नाराजी व्यक्त केली आणि आयफाचे आभार मानले.

रायजिंग राजस्थान समिट दरम्यान झाला होता वाद

हा वाद जुन्या प्रकरणाशीही संबंधित आहे. जेव्हा तीन महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये रायझिंग राजस्थानशी संबंधित सोनू निगमच्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि इतर मंत्री हे कार्यक्रमाच्या मध्यातच उठून निघून गेले होते. तेव्हा सोनू निगमने यासंदर्भात पोस्ट केली होती आणि आपला अपमान झाल्याचती भावना व्यक्त केली होती. तर आता त्यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट केली, त्यावरून तो वाद आजूनही सुरूच असल्याचे दिसते.