
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा गाजलेला सिनेमा म्हणजेच ‘फँड्री’. या चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव असते. ती मोठ्या आवडीनं चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता शिवजयंतीच्या निमित्तानं सगळीकडे उत्सवाचं वातावरण असताना शालूतरी कशी मागे राहणार, तर तिनंसुद्धा आता शिवजयंती स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एवढंच नाही तर तिनं एक स्पेशल फोटोशूट सुद्धा केलं आहे.
मराठमोळा साज, ब्लाऊजवर राजमुद्रा आणि हातात भगवा झेंडा… एकूणच शालूचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करतोय.
नेहमी हॉट फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या शालूचा हा अंदाज वघून चाहते घायाळ झाले आहेत.
मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा गाजलेला चित्रपट म्हणजेच ‘फँड्री’मध्ये सोज्वळ चेह-याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते.
तिचे काही हाॅट फोटो सुद्धा तिच्या सोशल मीडिया आपल्याला बघायला मिळती.
तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्याला तिचे अनेक हॉट फोटो बघायला मिळतील. काही दिवसांपूर्वी राजेश्वरीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. राजेश्वरीचा हा व्हिडीओनं चाहत्यांचं मन जिंकलं होतं.
संबंधित बातम्या
Video | गोड गळ्याच्या आईला बोबड्या बोलांची साथ, प्रियंका बर्वेने शेअर केला लेकाचा क्युट व्हिडीओ!