रजनीकांतचं राजकारणात पाऊल नाहीच, माझ्यावर दबाव आणू नका, चाहत्यांना आवाहन!

| Updated on: Jan 12, 2021 | 11:56 AM

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर गारूड निर्माण करणारे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. परंतू रजनीकांत यांचे चाहते त्यांना राजकारणात येण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यासाठी बर्‍याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. आता हे सर्व पाहून रजनीकांत यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून माझ्यावर […]

रजनीकांतचं राजकारणात पाऊल नाहीच, माझ्यावर दबाव आणू नका, चाहत्यांना आवाहन!
Follow us on

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर गारूड निर्माण करणारे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) हे राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. परंतू रजनीकांत यांचे चाहते त्यांना राजकारणात येण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यासाठी बर्‍याच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. आता हे सर्व पाहून रजनीकांत यांनी चाहत्यांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव आणू नये . (Rajinikanth appealed to the fans by tweeting)

रजनीकांत यांनी ट्विटरवरून तीन पानी ट्विट करून राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. तामिळमध्ये लिहिलेल्या पत्रात रजनीकांत यांनी आपल्या पक्ष प्रवेश न करण्याची कारणं देखील दिली होती. माझी तब्येत खालावली आहे. हा ईश्वराचा सूचक इशाराच मानतो. त्यामुळे मी राजकीय पक्ष स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लोकांनी त्यांना मी बळीचा बकरा बनवलं असं समजू नये, असं रजनीकांत यांनी या पत्रात नमूद केलं होते.

जयललिता यांच्यापाठोपाठ करुणानिधी यांचंही निधन झालं. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रीय पातळीवर दबदबा असलेला आणि तामिळनाडूवर अधिराज्य गाजवणारा बडा नेता तामिळनाडूच्या राजकारणात नाही. त्यामुळे तामिळनाडूत राजकीय बदलाची गरज होती.

ही गरज ओळखूनच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शी राजकारण करण्याची गरज आहे. जाती-धर्मापासून मुक्त अशा राजकारणाची गरज आहे. सध्या देशात अध्यात्मिक राजकारणाची गरज आहे. हीच माझी इच्छा आहे आणि हेच माझं लक्ष्य आहे, असं सांगत रजनीकांत यांनी अध्यात्मिक राजकारणासाठी राजकारणात येण्याची घोषणा केली होती.

संबधित बातम्या : 

New Project | सुपरस्टार विजयसोबत साऊतमध्ये एन्ट्री, कतरिना दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार!

सहावारी साडी नेसून अदा शर्मा समुद्रकिनारी, कार्टव्हील उडी पाहून चाहते हैराण!

(Rajinikanth appealed to the fans by tweeting)