
साऊथचे सुपरस्टार, हिंदीतही आपल्या नावाचा डंका वाजवणारे ‘थलायवा’ अर्थात रजनीकांत (Rajinikanth ) यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक असे हिट, सरस चित्रपट दिलेत. जगभरात त्यांचे कोट्यवधी चाहते आहे. आज (12 डिसेंबर) रजनीकांत यांचा वाढदिवस असतो. रजीनाकांत हे आज 75 वा वाढदिवस सेलिब्रेट करणार असून त्यांचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छा, अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. पण रजनीकांत हे त्यांचं खरं नाव नाही हे तुम्हाला माहीत आहे का ? त्यांच्या खऱ्या नावाबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल, चला जाणून घेऊया..
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली बंगळुरू येथे झाला. त्यांचे वडील रामोजी राव गायकवाड हे पोलिस कॉन्स्टेबल होते तर आई गृहिणी होती. त्यामुळे रजकांत हे मराठा हिंदू कुटुंबातील असून ते हिंदू धर्माचे पालन करतात
काय रजनीकांत यांचं खरं नाव ?
रजनीकांत यांच्या जातीबद्दल बोलायंचे झाले तर, ते गायकवाड समुदायाचे आहेत, जो महाराष्ट्रातील कुणबी किंवा मराठा गटांशी संबंधित मानला जातो. या सुपरस्टारचे खरं नावही खूपच कमी लोकांना माहिती आहे. रजनीकांत यांचं खरं नाव आहे शिवाजी राव गायकवाड. नंतर त्यांनी सर्वांना ज्ञात असं रजनीकांत हे नाव धारण केलं.
170 चित्रपटांत केलं काम
1975 साली प्रदर्शित झालेल्या “अपूर्व रागंगल” या तमिळ चित्रपटातून रजनीकांत यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. के. बालचंदर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली. त्यानतंर 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ चित्रपटात ते प्रमुख अभिनेत म्हणून झळकले होते. रजनीकांत हे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 170 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सुपरस्टारने तमिळ, हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं असून त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
कामाबद्दल बोलायचं झालं तर रजनीकांत हे शेवटचे “कुली” चित्रपटात दिसले होते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. तर आता रजनीकांत हे ‘जेलर 2’मध्ये दिसतील. 12 जून 2026 ला ह चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तसेच ते कमल हासन यांच्यासोबतही एका चित्रपटावर काम करत आहेत.