नागार्जुनच्या दुसऱ्या पत्नीमुळे मोडला असता रजनीकांत यांचा संसार, अमालाच्या प्रेमात थलायवाने उचलेलं मोठं पाऊल

Rajinikanth Love Life : नागार्जुन याच्या दुसऱ्या पत्नीच्या प्रेमात रजनीकांत स्वतःच्या पत्नी आणि मुलींना सोडायला झालेले तयार, होणार होता घटस्फोट... अमालाच्या प्रेमात रजनीकांत यांनी असं काय केलं होतं?

नागार्जुनच्या दुसऱ्या पत्नीमुळे मोडला असता रजनीकांत यांचा संसार, अमालाच्या प्रेमात थलायवाने उचलेलं मोठं पाऊल
Rajinikanth
| Updated on: Dec 13, 2025 | 8:48 AM

Rajinikanth Love Life : सुपरस्टार रजनीकांत हे एक असं नाव आहे, ज्याला कोणतीच गरज नाही… एवढंच नाही तर, काही ठिकाणी रजनीकांत यांना देवाचा दर्जा देण्यात आलाय… लोक त्यांच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक देखील करतात. 15 ऑगस्ट 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्व रागंगल’ या सिनेमातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.. , ‘बिल्ला’, ‘डॉन’, ‘मूंद्रु मुगम’, ‘थलपती’, ‘पडयप्पा’, ‘शिवाजी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका बजावली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं… रजनीकांत यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे… पण खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

रजनीकांत यांनी लता रंगाचारी यांच्या सोबत प्रेम विवाह केला. पण लग्नानंतर रजनीकांत यांचा जीव अभिनेते नागार्जुन यांची दुसरी पत्नी अमाला याच्यावर जडला… थक्क करणारी गोष्ट म्हणजे अमाला यांच्यासाठी रजनीकांत यांनी पत्नीला घटस्फोट देण्याचा देखील निर्णय घेतलेला…

रजनीकांत आणि अमाला यांचे सिनेमे

रजनीकांत आणि अमाला यांनी ‘मप्पिलाई’, ‘कोडी परक्कुथु’ आणि ‘वेलाइक्करन’ यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं… पडद्यावरील दोघांच्या केमिस्ट्रीला लोकांनी डोक्यावर घेतले… तेव्हा रजनीकांत यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली होती. अमाला या उभरत्या अभिनेत्री होत्या. अशात दोघांमध्ये भेटी वाढत गेल्या आणि प्रेम झालं. शुटिंगच्या सेटवर दोघे अधिक वेळ व्यतीत करायचे… असं देखील सांगण्यात येतं.

रजनीकांत आणि अमाला यांचं प्रेम

रजनीकांत आणि अमाला यांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं की, रजनीकांत यांनी पत्नीला घटस्फोट देण्याचा देखील निर्णय घेतलेला… रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी पत्नीला नोटीस देखील पाठवली होती. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये संतापाचं वातवरण दिसलं. त्यांचे सिनेमे देखील चाहत्यांनी बॅन केले.

अखेर पत्नीनेच सांभाळली परिस्थिती…

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच कळताच लता यांनी निर्माते के. बालाचंदर यांच्याशी संपर्क केला. जे रजनीकांत यांचे गुरु देखील होते. बालाचंदर यांची परिस्थिती हाताळली… लता यांना घटस्फोट दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील याबद्दल बालाचंदर यांनी रजनीकांत यांनी सांगितले.. या निर्णयाचा परिणाम रजनीकांत यांच्या कुटुंबावर तर झालाच असता, पण प्रोफेशनल आयुष्यात देखील त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असता…

अशात रजनीकांत यांनी स्वतः निर्णय बदलला आणि चर्चा देखील शांत झाल्या. रजनीकांत आणि लता यांनी 26 फेब्रुवारी 1981 रोजी लग्न केलं. तिरुपती येथील प्रसिद्ध भगवान बालाजी मंदिरात दक्षिण भारतीय पद्धतीने दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन सुंदर मुली झाल्या.