AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं

अभिनेता राजकुमार रावची एक इंस्टा पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. राजकुमारची पोस्ट पाहून तो बाबा होणार असल्याचं म्हणत चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र राजकुमार रावने त्याच्या पोस्टद्वारे खरी गुड न्यूज काय आहे ते स्पष्ट केलं आहे.

राजकुमार राव अन् पत्रलेखा आई-बाबा होणार?; अभिनेत्याने इंस्टा पोस्टवर स्पष्टच सांगितलं
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 30, 2025 | 7:11 PM
Share

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता ज्याने स्वत:च्या मेहनतीवर इंडस्ट्रीत आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली. राजकुमार याचा सहज-सरळ अभिनय आणि स्वभाव प्रक्षकांच्या मनाला कायमच भिडतो. राजकुमारचा नवा चित्रपट कधी येतोय याची प्रेक्षक वाटच पाहत असतात. पण सध्या राजकुमारने केलेल्या एका पोस्टमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

राजकुमारची इंस्टा पोस्ट व्हायरल

राजकुमारने एक पोस्ट त्याच्या इंस्टावर शेअर केली.ज्यामुळे अनेकांना असं वाटतं आहे की राजकुमार आणि पत्रलेखा लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यावर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी ‘तुम्ही आई-बाबा होणार आहात का?’ असं थेटच विचारलं. याबद्दल आता राजकुमार रावने पोस्टद्वारे स्पष्टच सांगितलं आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा आई-बाबा होणार?

चाहत्यांनी विचारलेल्या या प्रश्नांमुळे अखेर राजकुमार रावने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याचं उत्तर देताना लिहिलं आहे की, “काहीतरी खास येणार आहे. हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आता वेट होत नाहीये.” ही पोस्ट शेअर करत खाली कॅप्शनमध्ये राजकुमारने लिहिलं, “आम्ही अजूनतरी पॅरेन्टस् झालेलो नाहीये.” म्हणजे ही पोस्ट आई-बाबा बनण्याविषयी नाहीये. असं राजकुमारने पोस्टबद्दल खुलासाही केला आहे.

राजकुमार आणि पत्रलेखा एकत्र प्रोजेक्टवर काम

राजकुमार आणि पत्रलेखा हे आई-बाबा होणार नसून दोघं मिळून एका प्रोजेक्टवर काम करणार असल्याचं दिसून येत आहे. राजकुमारचे चाहते त्याच्या आणि पत्रलेखाच्या एकत्र प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहेत. या पोस्टवर चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकुमार राव आणि पत्रलेखाला पुन्हा एकदा एकत्र पाहाण्यासाठी चाहत्यांना आतुरता आहे.

‘सिटीलाइट्स’ नंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार 

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी ‘सिटीलाइट्स’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केलं नाही. त्यामुळे इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा एका प्रोजेक्टमध्ये ही जोडी एकत्र दिसणार असल्यानं चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, राजकुमार आणि पत्रलेखा जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या काळात त्यांनी एकमेकांना चांगल्या आणि कठीण परिस्थितीत आधार दिला. 15 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी पारंपरिक बंगाली पद्धतीने चंदीगड येथे लग्नगाठ बांधली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...