AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Kher : मी आर्थिक अडचणीत असूनही त्यानं…अनुपम खेर यांच्याबद्दल राजू खेर यांचा खुलासा

Raju Kher On Anupam Kher : अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर नुकत्याच एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. राजू खेर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आर्थिक अडचणींबद्दल सांगितलं आहे.

Raju Kher : मी आर्थिक अडचणीत असूनही त्यानं...अनुपम खेर यांच्याबद्दल राजू खेर यांचा खुलासा
| Updated on: Oct 06, 2026 | 4:10 PM
Share

अभिनेते राजू खेर यांनी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. राजू यांनी सांगितलं की, एकदा जेव्हा ते आर्थिक अडचणीत होते, तेव्हा त्यांचे भाऊ अनुपम खेर यांनी त्यांना मदतही केली नाही. त्यावेळी राजू यांनी आपलं घरही विकलं होतं. आपल्या कठीण काळाची आठवण सांगताना राजू खेर म्हणाले, ‘मी खूप कठीण परिस्थितीतून जात होतो.’

‘एक चॅनल सुरू होणार होतं. म्हणून मी माझे घरही विकलं होतं. मी एक फ्लॅट विकत घेतला होता, तो बुक केला होता आणि त्याचे पैसेही भरले होते. अचानक मला कळलं की ते चॅनल गायब झालं आहे. करार झाला होता आणि मी त्यासाठी ‘लाइफ के लिए कुछ भी करेगा’ नावाचा एक कार्यक्रमही तयार केला होता. फ्लॅट विकून जे पैसे मिळाले होते, ते मी त्या कार्यक्रमात गुंतवले आणि भाड्यानं राहू लागलो.’

अनुपम खेर यांनी मदत केली नाही

राजू पुढे म्हणाले, ‘या दरम्यान, मी दुसरीकडे एक फ्लॅट बुक केला होता. मला वाटलं होतं की आयुष्य एकदम फर्स्ट-क्लास होईल. माझ्या आई-वडिलांसाठी, मुलांसाठी आणि आमच्या पती-पत्नींसाठी. पण अचानक, ते चॅनल गायब झालं. मला कित्येक महिने कळलंच नाही. ते लॉक झालं होतं.’

‘तो एक मोठा धक्का होता. आता काय करायचं, असा प्रश्न मला पडला. मी विकत घेतलेल्या फ्लॅटचं काय करायचं, असाही विचार माझ्या मनात आला. त्यामुळे, आता मी कोणाशीही बोलू शकत नाही, फक्त माझा भाऊच आहे. तो मला मदत करेल. त्यावेळी माझ्या भावानेही काम करणं सोडून दिलं होतं. त्याला चांगल्या भूमिका हव्या होत्या. त्यामुळे, माझ्या भावानं मला मदत केली नाही.’ असं राजू पुढे म्हणाले. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राज खेर बोलत होते.

त्यावेळी अनुपम खेर स्वतः काम करत नव्हते, त्यामुळे ते आपल्या भावाला मदत करू शकले नाहीत. पण, या दोन भावांचं नातं नेहमीच खूप खास राहिलं आहे. या वर्षी मार्चमध्ये, ‘जिंदगी’ या यूट्यूब शोमध्ये रिचासोबतच्या संभाषणादरम्यान अनुपम यांनी खुलासा केला, ‘मी, राजू आणि इतर गोष्टींसाठी चेकवर सह्या करून ते वेगळे ठेवायचो आणि मी माझ्या मॅनेजरला स्पष्टपणे सांगितलं होतं की, मी माझ्या भावाला किती पैसे देतो हे मला कधीही विचारू नकोस.’

Follow Us
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....