Gold Customs Rules: घरात लग्न असेल तर परदेशातून किती सोनं आणण्याची परवानगी? महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे नियम
Gold Customs Rules: भारतात आता लग्न सराईची सुरुवात झाली आहे. पण भारतात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशात अनेक जण परदेशातून सोन आणायचं असेल, तर त्याच परवानगी आहे का आणि असेल तरी महिला आणि पुरुषांसाठी नियम वेगळे आहे... तर जाणून घ्या कायदा काय सांगतो.

Gold Customs Rules: भारतात आता लग्न सराईची सुरुवात झाली आहे. तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त निधतात. पण ऐन लग्न सराईच्या दिवसांत सोनं 1 लाखाच्या वर पोहोचलं आहे. शिवाय चांदीचे दर देखील गगनाला भिडेले आहेत. अशात अनेक जण असा विचार करतात की, लग्न आहे तर परदेशातून सोनं भारतात आणलं पाहिजे. पण परदेशातून भारतात सोनं आणण्याचे देखील वेगळे नियम आहे. सर्वांना असं वाटतं की, लग्नासाठी परदेशातून सोनं आणलं की, त्याला कोणत्याच प्रकारचा टॅक्स लागत नाही आणि सूट देखील मिळते. पण एयरपोर्ट कस्टमच्या नियमांनुसार, लग्नाचं कारण सांगितल्यानंतर ड्यूटी – फ्री सूट मिळत नाही. परदेशातून सोनं आणण्यासाठी काही सामान्य कायदे लागू होतात. जे अंतरराष्ट्रीय नागरिकांसाठी ठरवण्यात आले आहेत.
महिला आणि पुरुषांसाठी आहेत वेगळे कायदे..
सांगायचं झालं तर, अर्थ मंत्रालयाने लागू केलेल्या बॅगेज रूल्स 2026 नुसार, जर एखादा भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाची व्यक्ती एका वर्षांपेक्षा जास्त काळ परदेशात राहिल्यानंतर भारतात परत येत असेल, तर ती कोणत्याही कस्टम ड्युटीशिवाय एका निश्चित वजनापर्यंत सोन्याचे दागिने आणू शकते. या नियमानुसार, महिला प्रवासी जास्तीत जास्त 40 ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागिने ड्युटी-फ्री आणू शकतात, तर पुरुष किंवा इतर प्रवासी जास्तीत जास्त 20 ग्रॅमपर्यंत सोन्याचे दागिने कोणताही टॅक्स न भरता सोबत आणू शकतात. नवीन नियमांमध्ये सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील जुनी रुपयांची म्हणजेच किमतीची मर्यादा पूर्णपणे काढून टाकली असून, आता केवळ वजनाच्या आधारावरच ही सूट दिली जाते.
लग्नात सहभागी होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आणलेले दागिने
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (CBIC) नियमांनुसार, जर एखादा अनिवासी भारतीय किंवा परदेशी पाहुणा भारतात एखाद्या लग्नात किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपले दागिने घेऊन येत असेल आणि समारंभानंतर ते पुन्हा परदेशात घेऊन जाऊ इच्छित असेल, तर त्यास परवानगी दिली जाते. यासाठी प्रवाशाने भारतीय विमानतळावर उतरताच कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्पुरते बॅगेज आयात प्रमाणपत्र बनवून घेणं फार गरजेचं आहे; हे प्रमाणपत्र दाखवून प्रवासी परतीच्या प्रवासात कोणत्याही टॅक्स किंवा कायदेशीर अडचणीशिवाय आपले दागिने परत नेऊ शकतो.
सोन्याची नाणी आणि बिस्किटांसाठी वेगळे नियम
ड्युटी-फ्री सवलतीची ही तरतूद फक्त सोन्याच्या दागिन्यांनाच लागू होते. सोन्याची नाणी, बिस्किटे यावर कोणत्याही प्रकारची ड्युटी-फ्री सूट मिळत नाही. मात्र, जर एखादा भारतीय पासपोर्टधारक किंवा भारतीय वंशाचा प्रवासी किमान सहा महिने परदेशात राहिल्यानंतर भारतात परत येत असेल, तर तो परकीय चलनात निश्चित केलेली कस्टम ड्युटी भरून जास्तीत जास्त एक किलोग्रॅमपर्यंत सोने सोबत आणू शकतो, ज्यामध्ये दागिने, नाणी किंवा बिस्किटे यांचा समावेश असू शकतो.
