भर सभेत मोठा राडा! भाजप खासदार भडकला; थेट कार्यकर्त्यांना दिली आमदारावर हल्ला करण्याची ऑर्डर
सिद्धार्थनगरमध्ये भर सभेत मोठा राडा झाला. भाजप खासदार भडकला. त्यानंतर या खासदाराने थेट कार्यकर्त्यांना आमदारावर हल्ला करण्याची ऑर्डर दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीमुळे सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या आमदारांकडून अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम सुरू आहेत. सिद्धार्थनगरमध्येही एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. परंतु हा कार्यक्रम दोन लोकप्रतिनिधींच्या समर्थकांच्या हाणामारीमुळे गाजला. खासदार आणि आमदारांमध्ये वादावादी झाली. या दोन्ही नेत्यांचा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.
उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये एका प्रकल्पांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाजप खासदार जगदंबिका पाल आणि अपना दल पक्षाचे आमदार विनय वर्मा यांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडली. यानंतर बघता बघता दोन्ही गटात हाणामारी झाली. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांना मारहाण केली.
काय आहे प्रकरण ?
दोन्ही गटात हाणामारी सुरू झाल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाद मिटल्यानंतर आमदाराने पत्नी आणि जगदंबिका पाल यांच्यासोबत मिळून प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. खरंतर शनिवारी सकाळी 10 वाजता आरोग्य केंद्राच्या भूमी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी 19 कोटी मंजूर झाले आहेत. या कार्यक्रमात आमदार विनय वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप खासदार जगदंबिका पाल यांना कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यानंतरही पाल हे कार्यक्रमाला पोहोचले. कार्यक्रमस्थळी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालत स्वागत केलं. त्याचवेळी घटनास्थळी आमदार वर्मा यांचे समर्थक प्रदीप कमलपुरी यांनी नारेबाजी सुरू केली. त्यांनी आमदार विनय वर्मा यांच्या समर्थनात नारेबाजी केली. त्यांना विकास पुरुष म्हणून उपमा दिली. यानंतर खासदार जगदंबिका पाल यांच्या समर्थकांनी मंचावरच राडा केला. त्यांनी आमदाराचा समर्थक कमलपुरी यांना मारहाण करण्यात सुरुवात केली. या कार्यक्रमातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार पाल हे समर्थकांना मारहाणीचे ऑर्डर देत आहेत. त्यांचा या व्हिडिओवर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत आहे. या व्हिडिओवरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजप पक्ष आता आमदार, त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्याची ऑर्डर देणाऱ्याला खासदारावर काय करते, हे पाहावे लागेल.
