AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे नगराध्यक्ष थेट शिंदेंच्या बैठकीत; उदय सामंतांनी दिली मोठी हिंट

राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा पुन्हा सुरू झाली असून, शिंदे गटाच्या मंत्र्यांनी याला दुजोरा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीला हजेरी लावल्याने त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचक विधानांनी या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंचे नगराध्यक्ष थेट शिंदेंच्या बैठकीत; उदय सामंतांनी दिली मोठी हिंट
uday samantImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 2:16 PM
Share

राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे सेनेच्या मंत्र्यांनीच ही चर्चा सुरू केल्याने राज्यात कधीही ऑपरेशन टायगर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला थेट उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हजेरी लावली. त्यामुळे संदेश पारकर शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तुम्हीच अर्थ समजून घ्या, असं म्हणत या चर्चेला अधिकच हवा दिली आहे. त्यामुळे संदेश पारकर हे शिंदे गटात जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलं आहे. संदेश पारकर शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी ओपनिंग बॅट्समन म्हणून भाषण केले असेल, तर त्यातूनच सर्वांनी अर्थ समजून घ्यावा, असं सूचक विधान करतानाच ‘ऑपरेशन टायगर’बाबत सध्या आम्ही बोलणार नाही, दुष्काळामुळे सध्या त्यावर भाष्य टाळत आहोत, असं विधानही उदय सामंत यांनी केलं आहे.

शिंदे ऑपरेशन कधी करतात…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन कधी करतात, हे कोणालाही कळत नाही. खासदार ओमराजे निंबाळकर माझ्या बाजूला आहेत. त्यांचे ऑपरेशन कधी झाले, हे देखील कोणाला कळले नाही, असे म्हणत ओमराजेंच्या शिवसेना प्रवेशाची उदय सामंत यांनी आठवण करून दिली.

शिंदेंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या आमदाराचं रामनाम सत्य झालं असतं, असं म्हटलं होतं. त्यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांच्या ‘रामनाम सत्य’ विधानावरून एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिरसाट यांच्या वक्तव्याच्या आडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कमी करण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे काय करू शकतात, हे चांगलेच माहीत आहे. आमची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत आहे, असं उदय सामंत म्हणाले.

पारकर शिंदेंच्या बैठकीला

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यातील सर्व नगराध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संदेश पारकर हजर राहिल्याने सर्वांचेच कान टवकारले आहेत. ही बैठक झाल्यानंतर पारकर यांनी गुपचूप काढता पाय घेतल्याने पारकर शिंदेसेनेच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?