राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ‘ड्रामा क्वीन’ने वाजवली होती कानाखाली

एकेकाळी राखी सावंतला डेट करणारा प्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर अभिषेक अवस्थी आता पूर्णपणे बदलला आहे. नुकताच तो मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याचा बदललेला लूक पाहून नेटकरी थक्क झाले.

राखी सावंतच्या एक्स बॉयफ्रेंडचा लूक पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का; ड्रामा क्वीनने वाजवली होती कानाखाली
राखी सावंत, अभिषेक अवस्थी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2026 | 12:26 PM

‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचं खासगी आयुष्य जणू एखाद्या खुल्या किताबाप्रमाणेच आहे. राखीने दोन वेळा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिचा संसार मोडला. या घटस्फोटांआधी राखीने डान्सर आणि कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीला डेट केलं होतं. राखीच्या या एक्स बॉयफ्रेंडबद्दल जर तुम्हाला काही आठवत असेल तर त्याचा आताच व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. राखी सावंत आणि अभिषेक अवस्थीची भेट एका डान्स रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. डान्स रिहर्सलदरम्यान दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं होतं. दोघांनीही हे प्रेम लपवण्याचा अजिबात प्रयत्न केला नव्हता. ‘नच बलिए’च्या तिसऱ्या सिझनमध्ये राखी आणि अभिषेकने त्यांचं नातं जगजाहीर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती.

राखी सावंतने कोरिओग्राफर अभिषेक अवस्थीसोबत ‘नच बलिए’च्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या दोघांची केमिस्ट्री आणि डान्स इतका चांगला होता की ते या शोचे रनरअप ठरले होते. जवळपास तीन वर्षांपर्यंत हे दोघं एकमेकांना डेट करत होते. तीन वर्षांनंतर या दोघांच्या नात्यात वाद निर्माण होऊ लागले. अखेर एका व्हॅलेंटाइन डेनिमित्त अभिषेक राखीची मनधरणी करण्यासाठी तिच्या घरी गेला होता. फुलांचा गुच्छ आणि टेडी बियर घेऊन तो राखीच्या घरी पोहोचला होता. मात्र राखीने तिथे माध्यमांसमोरच अभिषेकच्या कानशिलात वाजवली. या घटनेनंतर दोघांचे मार्ग कायमचे वेगळे झाले.

पहा व्हिडीओ-

आता बऱ्याच वर्षांनंतर अभिषेक पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. नुकतंच त्याला मुंबईतील एका कार्यक्रमात पाहिलं गेलं. यावेळी अभिषेकला पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एकेकाळी इंडस्ट्रीतील लाडक्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या अभिषेकचा लूक आता बराच बदलला आहे. त्याचं वजन वाढलेलं दिसतंय आणि एकंदर तो पहिल्यापेक्षा आता खूपच वेगळा दिसतोय, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. ‘हा तर जेठालालसारखा दिसतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला हा खूप आवडायचा, पण आता तो पूर्णच बदलला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. राखीशिवाय यांना काहीच महत्त्व नाही, अशी टीकासुद्धा काहींनी केली. तर डान्सर आणि कोरिओग्राफर असलेल्या अभिषेकला नेमकं झालंय तरी काय, असा सवाल नेटकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.

Follow Us