
ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींना सामोरं गेली आहे. राखी सावंत सध्या दुबईत आहे. राखीवर नुकतंच सर्जरी करण्यात आली आहे. राखीच्या पोटातून 10 सेमीचा ट्यूमर काढ्यात आला आहे. तिला या कठीण काळात बॉलिवूडचा ‘सुल्तान’ सलमान खान याने अतिशय मोलाची मदत केली आहे. सलमान खान याने राखीचे मेडिकल बिलं भरली आहेत. त्यामुळे राखीने सलमानचे खूप आभार मानले आहेत. राखी सावंत हिने स्वत: एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. या मुलाखतीत राखीने यूट्यूबर अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मिक हिच्यावरही निशाणा साधला आहे.
सलमान खान याने आपल्या हॉस्पिटलचे बिलं भरल्याचं राखीने मुलाखतीत सांगितलं. सलमान आपल्याला काय लेव्हलला जावून मदत करतो, याबद्दल राखीने सांगितलं. दरम्यान, आजारी असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागलं या विषयी तिने माहिती दिली. या कठीण काळात सलमान खानने आपल्याला खंबीर साथ दिली, असं राखी म्हणाली. आपण न बोलवता सलमान खान मदतीसाठी पुढे आला आणि त्याने मोठ्या रकमेचे मेडिकल बिलं भरली, असं राखीने सांगितलं.
“सलमान खान आपल्या लोकांना कधीच विसरत नाहीत. ते कुणालाही न सांगता मदत करतात. त्यांनी मला मेडिकल बिल्स भरण्यातही मदत केली. माझा एक्स पती रितेश हा देखील माझ्यासोबत धैर्याने उभा राहिला. आम्ही आता विभक्त झालो आहोत, असं असताना रितेशने मला साथ दिली”, असं राखी सावंत म्हणाली.
राखीने यावेळी दु:ख व्यक्त केलं की, ती आता पुन्हा आई बनू शकणार नाही. “आतमध्ये वेदना खूप आहेत. पण या आयुष्याचा सामना करावाच लागेल. मी आता सरोगसीबद्दल विचार करेन. कारण मी मुलगा दत्तक घेऊ शकत नाही. मी विक्की डोनर सारखा प्लॅन करेन किंवा तसा विचार करेन. कारण कुणी वंशज हवं की नको?”, असं राखी सावंत म्हणाली.
यावेळी राखी सावंत हिने तिचा एक्स-पती आदिल खान दुर्रानी याच्याबद्दलही राग व्यक्त केला. “त्याने माझा फोन हॅक केला. स्वत:चे न्यूड व्हिडीओ लीक केले आणि माझ्याविरोधात केस टाकली. आता तो माझ्यावर ब्लेम करत आहे. मी निर्दोष आहे. त्याने मला बरबाद केलं. माझे सर्व पैसे घेऊन गेला. त्याने मला बदनाम केलं आहे”, असा आरोप राखी सावंत हिने केला.
राखी सावंत यावेळी आरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिकवरही संतापली. “चांगल्याची दुनियाच नाही. मी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होती कारण तिच्या बेस्ट फ्रेंडनेच तिच्या पतीसोबत लग्न केलं. त्यामुळे मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता. पण पायल माझंच नाव पब्लिसीटीसाठी वापरु लागली. अशा महिला देशाचं नाव खराब करत आहेत”, अशी टीका राखी सावंतने केली.