हैदराबाद: मेगास्टार चिरंजीवी यांच्या घरात लवकरच पाळणा हलणार आहे. कारण त्यांची सून आणि साऊथ सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासना कोनिडेला गरोदर आहे. खुद्द चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. ‘श्री हनुमानजी यांच्या कृपेने उपासना आणि रामचरण यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. रामचरणने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.