AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामचरणच्या बहिणीचं 19 व्या वर्षी पळून लग्न, पतीचं निधन; म्हणाली “हे सर्व माझ्यासोबतच का..”

साऊथ सुपरस्टार रामचरणची बहीण श्रीजा कोनिडेला हिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्या भावनिक आणि मानसिक संघर्षांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी श्रीजाने पळून लग्न केलं होतं.

रामचरणच्या बहिणीचं 19 व्या वर्षी पळून लग्न, पतीचं निधन; म्हणाली हे सर्व माझ्यासोबतच का..
रामचरण आणि त्याची बहीण श्रीजाImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 10, 2026 | 11:22 AM
Share

साऊथ सुपरस्टार रामचरणची बहीण आणि मेगास्टार चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा कोनिडेलाने तिच्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. नुकतीच श्रीजा तिच्या मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमधून बाहेर येत आता स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा श्रीजाने केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या भावनिक प्रवासाविषयी बोलताना दिसत आहे. पंधरा महिन्यांच्या एका स्व-विकास गटाने तिला असहायतेच्या भावनेवर मात करण्यास आणि अधिक सामर्थ्यवान बनण्यास मदत केली, असं श्रीजाने स्पष्ट केलं.

या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “मी द्विधा मनस्थितीत होते. हे सर्व माझ्यासोबतच का घडतंय, असा प्रश्न मला पडला. मलाच का इतक्या वेदना सहन कराव्या लागत आहेत? एकापाठोपाठ एक अडचणी का येत आहेत? हे सर्व माझ्याच वाट्याला यावं असं मी काय केलं होतं? असे प्रश्न मी सतत विचारायची. मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की आपलं आयुष्य घडवण्याची आणि बदलण्याची शक्ती ही आपल्यातच असते. माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ मी स्वत:ला माझ्या वेदना, भूतकाळ आणि अडचणींशी जोडून पाहिलं होतं. माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या, त्यातूनच माझी ओळख तयार झाली होती. पण आता मी स्वत:ला त्यापलीकडे पाहू लागले आहे. माझ्या वेदना अजूनही माझ्यात आहेत, पण मी फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. एका व्यक्तीमध्ये याहून खूप काही असतं आणि त्या पैलूंचा शोध घेणं हा माझ्यासाठी या प्रवासातील सर्वांत सुंदर भागांपैकी एक ठरला आहे.”

श्रीजाचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Sreeja (@sreejakonidela)

श्रीजाने 2007 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी बॉयफ्रेंड शिरीष भारद्वाजसोबत पळून लग्न केलं होतं. हैदराबादमधील एका आर्य समाज मंदिरात या दोघांनी गुपचूप लग्न उरकलं होतं. चिरंजीवी यांची लेक असल्याने तिचं हे नातं माध्यमांमध्ये खूप चर्चेत होतं. लग्नाच्या एका वर्षातच तिने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ लागल्या. 2011 मध्ये श्रीजाने शिरीष आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध हुंडा आणि छळाचा खटला दाखल केला. 2014 मध्ये अखेर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शिरीषने राजकारणात प्रवेश करत नंतर दुसरं लग्न केलं. 2019 मध्ये आजारपणामुळे त्याचं निधन झालं.

शिरीषला घटस्फोट दिल्यानंतर 2016 मध्ये श्रीजाने कल्याण देवशी दुसरं लग्न केलं. कल्याण देव हा प्रसिद्ध अभिनेता असून तो श्रीजाचा बालपणीचा मित्रही होता. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांना एक मुलगी झाली. दुर्दैवाने 2022 मध्ये श्रीजा आणि कल्याण देव यांच्याही विभक्त होण्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. त्यानंतर कल्याणने स्वत:हून इन्स्टाग्रामवर त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत पोस्ट लिहिली होती.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच