AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; ‘लॉकअप’ सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल

राम कपूर सध्या चर्चेत आहे. 'लॉक अप'मधील त्यांच्या वागणुकीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शोमध्ये आता त्यांनी एका 25 वर्षीय इन्फ्लुएन्सरला किस्स केले आहे ज्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

52 वर्षीय राम कपूरने 25 वर्षांनी लहान इन्फ्लुएन्सरला जबरदस्ती केले किस; 'लॉकअप' सिझन 2 शोमधील व्हिडिओ व्हायरल
ram kapoor
| Updated on: Jul 01, 2026 | 11:30 AM
Share

टीव्ही सुपरस्टार राम कपूर सध्या एकता कपूरच्या ‘लॉकअप’ सिझन 2 या शोमध्ये बंद आहे. शोमधील त्याच्या कामगिरीपेक्षा राम त्याच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे जास्त चर्चेत आहे. लग्नानंतर जर तुम्ही तुमच्या पार्टनरला चीट केले असेल तर ते चुकीचे ठरु शकत नाही हे सामान्य आहे. रामच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा झाली.  या शोमध्ये गेल्यापासून राम कपूरने अशी बरीच विधान केली ज्यामुळे त्याच्यावर टीक होत आहे. पण आता त्याने एक अशी कृतीही केली ज्यामुळे चाहते त्याच्यावर भडकले आहेत. रामने जे केले त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रामने इन्फ्लुएन्सर वरुण यादव, जो लैला म्हणूनही ओळखली जातो, त्याला किस करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या कृत्यामुळे राम ट्रोल होत आहे. ‘लॉकअप’च्या एपिसोडमध्ये, काही स्पर्धक गार्डन एरियामध्ये आराम करत होते. रामने त्याच्या शेजारी बसलेल्या लैलाला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्या गालावर किस केले. पण राम तिथेच थांबला नाही. त्याने लैलाला लिप-लॉकही दिला. रामने लैलाला ओठांवर ओठ टेकवून किस केले की फक्त तसे भासवले, हे सांगणे कठीण आहे, कारण कॅमेऱ्यात रामने लैलाला व्यवस्थित लिप-किस दिल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by LockUp (@lockup.netflix)

राम कपूरचा हा अवतार पाहून गोविंदाची पत्नी, सुनीता आहुजा, थक्क झाली. आश्चर्याने तिचे तोंड उघडेच राहिले. राम आणि लैलाच्या किसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. एवढ्या मोठ्या शोमध्ये 52 वर्षीय राम कपूर अशा प्रकारे वागत असल्याचे पाहून लोक संतापले आहेत. सोशल मीडियावर या अभिनेत्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. एका युझरने लिहिले, “याला म्हणतात मर्यादा ओलांडणे. तुम्ही टीआरपीसाठी काहीही कराल. लाजिरवाणे.” दुसऱ्याने लिहिले, “हा काय मूर्खपणा आहे?”

राम कपूर यापूर्वी लग्नानंतरही चीट कर केले तर चुकीचे नाही याचे समर्थन करण्यासारखे विधान करत होते. त्याने म्हटले होते की, प्रत्येकाने आपले नाते एका चुकीनंतर संपवू नये, ते पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राम यांनी असा युक्तिवाद केला होता की, जर जोडप्याचे एकमेकांवर खरे प्रेम असेल, तर नात्यात कोणतीही गोष्ट अडथळा ठरू शकत नाही. या वक्तव्यामुळेही राम यांना ट्रोल करण्यात आले होते.

Follow Us
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!