AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

41 वर्षांपूर्वी सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, आता चारतेय मेंढी, कोण आहे ती?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिच्या बोल्ड लुकने वेधलेलं सर्वांचं लक्ष. 41 वर्षांपूर्वी पांढऱ्या साडीमधील दिलेले अनेक बोल्ड सीन. आता तिच अभिनेत्री मेंढी चारताना दिसली. कोण आहे ती?

41 वर्षांपूर्वी सर्वात बोल्ड सीन देणारी अभिनेत्री, आता चारतेय मेंढी, कोण आहे ती?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 12, 2026 | 4:59 PM
Share

‘राम तेरी गंगा मैली’ या गाजलेल्या चित्रपटातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री मंदाकिनी सध्या मोठ्या पडद्यावर फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या आयुष्यातील खास क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच मंदाकिनीने मनालीच्या निसर्गरम्य वातावरणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, तिच्या या व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे.

मनालीत रमली मंदाकिनी

मंदाकिनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मनालीमधील सुंदर क्षणांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती निळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची पँट अशा सिंपल पेहरावात दिसत आहे. हिरव्यागार डोंगररांगा आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना ती एका मेंढीला हाताने धरून पुढे जाताना दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आजूबाजूचं निसर्गरम्य वातावरण लक्ष वेधून घेत आहे.

मनालीतील आठवणींना दिला उजाळा

हा व्हिडीओ शेअर करत मंदाकिनीने मनालीमध्ये घालवलेल्या सुंदर दिवसांची आठवण काढली. बर्फाच्छादित पर्वत, नयनरम्य दृश्यं आणि निसर्गाची शांतता यांचा पुन्हा अनुभव घेण्याची इच्छा तिने व्यक्त केली. काही ठिकाणं केवळ आठवणी देत नाहीत तर आपल्या मनाचा एक भागही आपल्यासोबत जोडून ठेवतात अशा भावनाही तिने व्यक्त केल्या. लवकरच पुन्हा डोंगरांच्या सान्निध्यात परतण्याची इच्छा असल्याचं तिच्या पोस्टमधून दिसून येतं.

‘राम तेरी गंगा मैली’ला पूर्ण झाली 41 वर्षे

मंदाकिनीने 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 41 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने आनंद व्यक्त केला होता. इतक्या वर्षांनंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेम आपल्यासाठी खास असल्याचं तिने म्हटलं होतं. याशिवाय तिने ‘डान्स डान्स’, ‘कमांडो’, ‘जीते हैं शान से’ आणि ‘नाइंसाफी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

सध्या मंदाकिनीने शेअर केलेल्या मनालीतील व्हिडीओमुळे तिच्या चाहत्यांना तिचा निसर्गप्रेमी अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप