Urmila Bhatt : ‘रामायण’ फेम अभिनेत्रीची झालेली निर्घृण हत्या; 29 वर्षानंतरही मृत्यूचं गूढ कायम; काय घडलेलं?

Ramayan Fame Actress : 'रामायण' मालिकेतील अभिनेत्रीची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली. अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

Urmila Bhatt  : रामायण फेम अभिनेत्रीची झालेली निर्घृण हत्या; 29 वर्षानंतरही मृत्यूचं गूढ कायम; काय घडलेलं?
| Updated on: Nov 13, 2026 | 8:46 PM

सध्या रणबीर कपूरच्या ‘रामायण‘ या सिनेमाची चर्चा असून सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही कलाकारांनी सिनेमावर टीकाही केली आहे, तर काहींनी सिनेमाचं कौतुक केलंय. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘रामायण‘ या मालिकेचीही चर्चा सुरू झाली. या मालिकेत अरुण गोविल, दीपिका चखलिया, सुनील लहरी, या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारलेल्या. या मालिकेत आणखी एक अभिनेत्री होती ती म्हणजे उर्मिला भट्ट. अभिनेत्री उर्मिला भट्ट यांनी ‘रामायण‘ या मालिकेत सीतेच्या आईची म्हणजेच सुनैनाची भूमिका साकारलेली. पण, तुम्हाला माहितीये का? अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

रामायणात सीतेच्या आईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला भट्ट यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. उर्मिला भट्ट जुहू येथील बंगल्यात आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगत होत्या. त्यांच्या कुटुंबात पती, मुलगा, सून आणि नातवंडे यांचा समावेश होता. त्यांची एक मुलगी, रचनाचं लग्न मुंबईत झालं होतं. 21 फेब्रुवारी 1997 रोजी, त्यांचा मुलगा आपल्या मुलांसोबत सहलीला गेला होता.

Loading...

अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ कायम

उर्मिला आणि त्यांचे पती घरी एकटेच होते. उर्मिला यांचे पती काही कामासाठी बडोद्याला गेले होते. अभिनेत्री उर्मिला घरी एकट्या होत्या. 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी लवकर जेव्हा मोलकरीण आली, तेव्हा तिनं दरवाजा ठोठावला, पण तो उघडला नाही. त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली, पण आतून काहीच हालचाल नव्हती. रचनानं पती विक्रम पारेखला आईची चौकशी करण्यासाठी पाठवलं. विक्रम संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता जुहू बंगल्यावर पोहोचले. ते दरवाजा ठोठावत राहिला, पण कोणीही उत्तर दिलं नाही. आवाज ऐकून शेजारी जमा झाले. विक्रमनं रचनाला फोन करून घडलेली घटना सांगितली. रचनासुद्धा तिथं आली आणि तिनं दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जेव्हा मी घराभोवती नजर फिरवली, तेव्हा मला एक भयानक दृश्य दिसलं. संपूर्ण फरशीवर रक्त पसरलं होतं. उर्मिला भट्ट यांचा मृतदेह फरशीवर पडला होता. त्यांना दोरीनं बांधलं होतं, त्यांच्या तोंडात कापड कोंबलं होतं आणि अभिनेत्रीची गळा चिरून हत्या करण्यात आलेली.

उर्मिला भट्ट यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1933 रोजी डेहराडूनमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. उर्मिला भट्ट यांनी गुजराती चित्रपटसृष्टीत लवकरच स्वतःचं स्थान निर्माण केलं. याच काळात त्यांची भेट प्रसिद्ध गुजराती रंगभूमी कलाकार आणि गुजराती चित्रपट दिग्दर्शक मार्कंड भट्ट यांच्याशी झाली. एकत्र काम करत असताना त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा आणि रचना नावाची एक मुलगी आहे. उर्मिला भट्ट यांनी एका मुलाखतीत उर्मिला यांनी सांगितलेलं की, त्या एका महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक बीआर चोप्रा यांना भेटल्या. त्यांनी अभिनेत्रीला ‘हमराझ’ चित्रपटात भूमिका ऑफर केली.

त्यानंतर 1967 मध्ये उर्मिला यांच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात झाली. उर्मिला यांनी त्यानंतर ‘संघर्ष’ आणि ‘गौरी’ सारख्या चित्रपटात काम केलं. त्यांनी ‘दो अंजाने’ आणि ‘तीसरी मंझिल’ सारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. उर्मिला भट्ट यांनी ‘अखियों के झरोके से’, ‘बदलते रिश्ते’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us