AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonalee Kulkarni : माझं एका राजकारण्यासोबत लग्न झालंय, त्यांनी मला राहायला घर…सोनाली कुलकर्णीनं सांगितलेला किस्सा, काय घडलेलं?

Sonalee Kulkarni : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं एका जुन्या मुलाखतीत तिनं स्वतःबद्दल ऐकलेल्या अफवेबद्दल सांगितलेलं.

Sonalee Kulkarni : माझं एका राजकारण्यासोबत लग्न झालंय, त्यांनी मला राहायला घर...सोनाली कुलकर्णीनं सांगितलेला किस्सा, काय घडलेलं?
| Updated on: Nov 13, 2026 | 3:30 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिनं आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र, एकेकाळी सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी एक अफवा पसरली होती, ज्यामुळे अभिनेत्रीही आश्चर्यचकित झाली होती. एका प्रसिद्ध राजकारण्यासोबत तिचं लग्न झालं असून त्यांनी तिला राहण्यासाठी घर दिलं आहे, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. एका मुलाखतीत सोनालीनं या अफवेचा खुलासा केला.

सोनाली कुलकर्णीनं सांगितलेला किस्सा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जयंती वाघधरेच्या ‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला तिच्या आयुष्यातील एका चर्चेत राहिलेल्या अफवेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर सोनालीनं हा मजेशीर पण तितकाच आश्चर्यकारक किस्सा सांगितला. सोनाली म्हणाली की, एकेकाळी तिचं एका राजकारण्यासोबत लग्न झाल्याची अफवा पसरली होती. एवढंच नाही, तर त्या राजकारण्याने तिला राहण्यासाठी घरदेखील दिल्याची चर्चा सुरू होती. ही बातमी ऐकून अनेकांनी तिला फोन करून याबाबत विचारणा केली होती.

सोनाली कुलकर्णी म्हणालेली की, ‘माझं एका पॉलिटिशनसोबत लग्न झालंय, त्यांनी मला राहायला घरं दिलंय. जेव्हा ही अफवा पसरली होती, तेव्हा मला अनेकांचे फोन आले. माझ्या चुलत बहिणीनं देखील मला फोन करुन विचारलं की, काय तुझं लग्न झालंय का? मी तिला म्हटलं की, अगं माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवेन, बहिण आहेस माझी तू, तेव्हा ती म्हणाली होती अगं होऊ शकतं. पण असं कधीच काहीच नव्हतं. या निव्वळ चर्चा होत्या.’

दरम्यान, सोनाली कुलकर्णीनं ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’, ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

Follow Us
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा