AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्पाइसजेटचं खरं नाही! उड्डाणे रद्द, धूळ खाणारी विमाने… 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारही नाही

SpiceJet Crisis: सध्या बजेट एअरलाइन स्पाइसजेट (SpiceJet) सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार कंपनीसाठी उड्डाणांचे नियमित संचालन करणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे.

स्पाइसजेटचं खरं नाही! उड्डाणे रद्द, धूळ खाणारी विमाने... 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारही नाही
Spice-JetImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 3:20 PM
Share

सरकारचा दावा आहे की, विमान प्रवास परवडणारा आणि सर्वांसाठी सुलभ होत असल्यामुळे, पायात स्लिपर घालूनही कोणीही विमानाने प्रवास करेल. पण त्याच वेळी, एकापाठोपाठ एक विमान कंपन्या कर्जात बुडत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर होत आहेत. असेच काहीचे स्पाईसजेट या विमान कंपनीसोबत घडले आहे. कंपनीला अक्षरश: उड्डाणे बंद करण्याची वेळ आली आहे.

मे २००५ मध्ये उड्डाणे सुरू करणारी स्पाइसजेट एकेकाळी देशातील दुसरी सर्वात मोठी बजेट एअरलाइन होती. पण आज ती आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. कंपनीसमोर संकट मोठे आहे. इतिहास पाहिला तर अनेक एअरलाइन कंपन्या अशाच प्रकारे हळूहळू गायब झाल्या.

सध्या स्पाइसजेटची परिस्थिती पाहता कंपनीसमोर चोहोबाजूंनी आव्हाने आहेत. कोव्हिड-१९ नंतर कंपनी गंभीर आर्थिक संकटात अडकली. कंपनीवर एकूण देणी ४,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पोहोचली आहेत. यात विमान लीज देणाऱ्या कंपन्या, एअरपोर्ट ऑपरेटर्स आणि कर्मचाऱ्यांची थकबाकी (पीएफ, टीडीएस, जीएसटी) यांचा समावेश आहे. वेळेवर भाडे न भरल्यामुळे अनेक परदेशी कंपन्यांनी स्पाइसजेटला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये ओढले आणि आपली विमाने परत मागितली.

खरं तर भारतीय विमानन क्षेत्रात गेल्या एका दशकात मोठी उलथापालथ झाली आहे. एकीकडे हवाई प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे, तर दुसरीकडे महाग इंधन (एटीएफ), डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन आणि कमी भाड्याची स्पर्धा यांनी अनेक एअरलाइन्सची कंबर मोडली आहे. सध्या बजेट एअरलाइन स्पाइसजेट सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. नोव्हेंबर २०२६ पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार कंपनीसाठी उड्डाणांचे नियमित संचालन करणे अत्यंत आव्हानात्मक झाले आहे.

विमानांची मोठी कमतरता असल्याने स्पाइसजेटचा सक्रिय ताफा केवळ १२ ते १३ विमानांपर्यंत आला आहे. यापैकी काही विमाने वेट लीजवर घेतलेली आहेत. ताफ्यात कमी विमाने असल्याचा थेट परिणाम प्रवाशांच्या संख्येवर झाला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये एअरलाइनचा देशांतर्गत बाजारपेठ वाटा केवळ १ टक्क्यापेक्षाही कमी झाला आणि या काळात कंपनीने केवळ सुमारे ७३,००० प्रवाशांना सेवा देऊ शकली. एकेकाळी स्पाइसजेट देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाइन कंपनी होती.

अहवालांनुसार विमाने आणि आर्थिक संकटामुळे स्पाइसजेट दररोज सरासरी १५ ते २० हून अधिक उड्डाणे रद्द करत आहे. नोव्हेंबर २०२६ च्या सुरुवातीच्या दिवसांत (५ ते ९ नोव्हेंबर) केवळ ५ दिवसांत कंपनीने एकूण ३३३ उड्डाणे रद्द केली. यासोबतच एअरलाइनचा ‘ऑन-टाइम परफॉर्मन्स’ (OTP) म्हणजे वेळेवर उड्डाण भरल्याचा रेकॉर्ड घसरून १६.६ टक्क्यांच्या अत्यंत निम्न पातळीवर पोहोचला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे.

Follow Us
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा