AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 कोटींची हवेली, 50 तोळे सोनं आणि… सरकारी इंजीनिअरकडे सापडला मोठा खजिना; 10 ठिकाणी रेड

तेलंगणातील एका सरकारी अभियंत्याच्या 10 ठिकाणांवर एसीबीने छापे टाकले. सिंचन विभागातील राघिरी सत्यनारायण याच्याकडे 7 कोटींची हवेली, 25 एकर शेती, 50 तोळे सोनं, अनेक फ्लॅट्स आणि गाड्या सापडल्या. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी हा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, या ‘खजिन्या’चा सखोल तपास सुरू आहे.

7 कोटींची हवेली, 50 तोळे सोनं आणि... सरकारी इंजीनिअरकडे सापडला मोठा खजिना; 10 ठिकाणी रेड
Telangana Engineer's 7 Cr MansionImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 3:21 PM
Share

तेलंगणातून मोठी बातमी समोर आली आहे. एका सरकारी इंजीनिअरच्या 10 ठिकाणांवर करण्यात आलेल्या छापेमारीत आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठा खजिना सापडला आहे. या सरकारी अभियंत्याकडे 7 कोटींची हवेली, 25 एकर शेती, सुमारे 50 तोळे सोनं सापडलं आहे. त्याच्याकडे अनेक फ्लॅट असल्याचंही उघड झालं आहे. एवढं मोठं घबाड या अभियंत्याकडे सापडल्याने सर्वांची झोपच उडाली आहे. सरकारी पगारात त्याने एवढं साम्राज्य उभं कसं केलं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

सिंचन विभागातील हा डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजीनिअर आहे. राघिरी सत्यनारायण असं त्याचं नाव असून त्याच्या 10 ठिकाणांवर एसीबीने धाडी मारून तपास सुरू केला आहे. एसीबीच्या तपासात आतापर्यंत जमीन, हवेली, फ्लॅट, सोनं, गाड्या आणि गुंतवणुकीशी संबंधित संपत्ती सापडली आहे. या लिस्टमध्ये 7 कोटीची एक हवेलीही आहे. त्यामुळे तपास अधिकारीही चक्रावले आहेत. उत्पन्नापेक्षाही अधिक संपत्ती या अभियंत्याने कशी जमवली? याचा शोध एसीबी घेत आहे.

मूळ गावाही धाडी

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला असून त्यानुषंगाने एसीबी आता तपास करत आहे. त्यांचं मूळ गाव शापूर, वानापर्थी, हैद्राबाद आणि नातेवाईकांच्या ठिकाणांवरही एसीबीने छापे मारले आहेत. या तपासात एसीबीला जमीन आणि खोलीशी संबंधित दस्ताऐवज आणि इतर संपत्ती मिळाली आहे. या एकूण संपत्तीचं बाजार मूल्यही काढलं जात आहे.

बायकोच्या नावे 9 प्लॉट

या अभियंत्याकडे हैद्राबादच्या कुकटपल्ली येथे एक हवेली असल्याचं समोर आलं आहे. कुटुंबातील सदस्याच्या नावावर ही हवेली आहे. त्याचं बाजार मूल्य 7 कोटी आहे. त्याशिवाय वानापर्थीमध्ये सुमारे 25 एकर शेती आणि फार्महाऊसही त्याच्याकडे असल्याचं उघड झालं आहे.

सत्यनारायण याच्या पत्नीच्या नावे एकूण 9 प्लॉट असल्याची माहिती समोर आली आहे. हैद्राबादमध्ये दोन फ्लॅटही असल्याचं आढळून आलं असून त्याचा तपास सुरू आहे. यात एक 3-BHKचा फ्लॅट करमनघाटमध्ये आणि दुसरा 2-BHK फ्लॅट रॉकटाऊन, नागोलेमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे फ्लॅट किंवा जमीनच चौकशीच्या फेऱ्यात नाहीये तर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेली प्रॉपर्टीही शोधली जात आहे.

चार फोर व्हिलर, एक टू व्हिलर

या छापेमारीत सुमारे 50 तोळे सोनंही सापडलं आहे. त्याच्या कुटुंबाकडे तीन ते चार फोर व्हिलर आणि एक टू व्हिलर असल्याचं आढळून आलं आहे. याशिवाय म्यूच्युअल फंड आणि चिट फंडमध्ये सुमारे 20 लाख रुपयांची त्याने गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. त्याच्या विमा पॉलिसींची माहिती घेतली जात आहे. मात्र, चौकशीत एकही बँक लॉकर सापडलेलं नाहीये.

Follow Us
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?
तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता..
NCP Politics : सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठा खिंडार; राष्ट्रवादीचा तो नेता शिंदेसेनेत प्रवेश करणार
दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या....
CNG Crisis : दिवाळीत महागाईचा डबल झटका, CNG दरात एवढ्या रुपयाची वाढ; वाहनांच्या लांबच लांब रांगा