Ramayana : रणबीर कपूर आणि यशचा ‘रामायण’ पाकिस्तानातही रिलीज होणार ? समोर आली महत्त्वाची माहिती
Ramayana : रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ' रामायण ' हा जगभरात रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. पण पाकिस्तानमध्येही हा पिक्चर रिलीज होणार का

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या ‘ रामायण ‘ चित्रपटाबद्दल चाहते अतिशय उत्सुक आहेत. येत्या 5 नोव्हेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, ज्याची चाहते अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटाबद्दल रोज नव-नवे अपडेट्स समोर येत असतात, तसेच अनेक चर्चाही होत असतात. ‘ रामायण ‘ चित्रपटाची क्रेझ फक्त भारतापुरती मर्यादित नाही तर दुसऱ्या देशांतही पहायला मिळत आहे.
यामध्ये भारताच्या शेजारचा देश, पाकिस्तानचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये काही लोकं नुकतेच एका मंदिरात फिल्मचं पोस्टर लावताना दिसले. त्यामुळे रणबीर कपूरचा हा चित्रपट पाकिस्तानमध्येही रिलीज होणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. चला जाणून घेऊया..
पाकिस्तानातही रिलीज होणार ‘रामायण’?
‘रामायण’ चित्रपटाबद्दल वाढती चर्चा आहे, मात्र पाकिस्तानात या चित्रपटाच्या थिएटर रिलीजबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. द फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या राजकीय आणि लष्करी तणावामुळे, सध्या तिथे भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर निर्बंध आहेत. याच पार्श्वभूमीवर रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ चित्रपट हा पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी मिळते की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरेल. याशिवाय, ऑगस्ट 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पाकिस्तान शोबिझ’च्या एका वृत्तात असं सांगण्यात आलं होतं की, सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय चित्रपटांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी करणं बंद केलं होतं.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रामायण चित्रपटाच्या मेकर्सनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचे वितरण करण्यासाठी सोनी पिक्चर्ससोबत भागीदारी केली आहे. मात्र हा चित्रपट जगभरात रिलीज करण्याची योजना असली तर प्रत्येक देशात फिल्म रिलीजसाठी परवानगी मिळाली आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच निर्मात्यांकडूनही पाकिस्तानमध्ये ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
100 देशात रिलीज होणार फिल्म
नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘रामायण’ हा चित्रपट जगभारत भव्य स्तरावर प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. हा चित्रपट 100 पेक्षा अधिक देशांमध्ये 50 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील सर्वात प्रसिद्ध पौराणिक कथांपैकी एक असलेली रामायणाची कथा, तसेच देशाची समृद्ध संस्कृती आणि सभ्यता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.