Ramayana Box Office Collection Day 17: आदिनाथ कोठारे स्टारर ‘रामायण’ची वीकेंडला तुफान बॅटिंग; 17 व्या दिवशी रचला नवा इतिहास!

Ramayana Box Office Collection Day 17: अभिनेता आदिनाथ कोठारे आणि रणबीर कपूर स्टारर 'रामायण' सिनेमाने सलग 17 व्या दिवशी देखील बक्कळ कमाई केली आहे. आता सिनेमाच्या 17 व्या दिवसाचे आकडे देखील समोर आले आहे. 17 व्या दिवशी सिनेमाने नवा इतिहास रचला आहे.

Ramayana Box Office Collection Day 17: आदिनाथ कोठारे स्टारर रामायणची  वीकेंडला तुफान बॅटिंग; 17 व्या दिवशी रचला नवा इतिहास!
Ramayana
| Updated on: Nov 22, 2026 | 7:52 AM

Ramayana Box Office Collection Day 17: दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमा 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून सिनेमा सलग 17 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तिसऱ्या शनिवारी देखील सिनेमाने नवा इतिहास रचला आहे. सांगायचं झालं तर, 16 व्या दिवसाच्या तुलनेत सिनेमाने 17 व्या दिवशी अधिक कमाई केली आहे. 16 दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी सिनेमाने 15.75 कोटी रुपयांची कमाई केलेली. आता 17 व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. मधल्या काही दिवसांमध्ये सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावलेला, पण आता पुन्हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी बॅटींग करण्यास सुरुवात केली आहे.

‘रामायण’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, हा सिनेमा हिंदीसोबतच मल्याळम, तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. एवढंच नाही तर, कमाईचे आकडे दर्शवतात की या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. आता सिनेमाच्या १७व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. तर जाणून घ्या सिनेमाने आतापर्यंत किती कोटी रुपयांची कमाई केली आहे,

Loading...

‘रामायण’ सिनेमाचं 17 व्या दिवसाचं कलेक्शन

‘रामायण’ सिनेमा फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील मोठी कमाई करत आहे. शनिवार असल्यामुळे सिनेमाच्या कमाई वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. ‘रामायण’ सिनेमाने 15 हजार 841 शोसह 27.40 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कर शु्क्रवारी म्हणजे 16 व्या दिवशी सिनेमानो फक्त 15.75 कोटी रुपयांची कमाई केलेली. तर सिनेमाने भारतात आतापर्यंत 906.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रामायण’ सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन..

‘रामायण’ सिनेमाने तिसऱ्या शनिवारी 20.25 कोटी रुपयांचं कलेक्श केलं आहे. अन्य भाषांबद्दल सांगायचं झालं तर सिनेमाने मल्याळम भाषेमध्ये 2.75 कोटी, तमिळ भाषेमध्ये 2 कोटी, कन्नड भाषेमध्ये 1.65 कोटी आणि तेलुगू भाषेमध्ये 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर परदेशात या रामायाण सिनेमाने 17 व्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे तिथला एकूण ग्रॉस कलेक्शन 533 कोटी रुपये झाला आहे. अशा प्रकारे, जगभरात ‘रामायण’ सिनेमाचा एकूण ग्रॉस कलेक्शन 1,616.70 कोटी रुपये झाला आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा फक्त 17 दिवसांमध्ये अनेक हिट सिनेमांचा रेकॉर्ड मोडला आहे. आज रविवार आहे, म्हणून सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगायचं झालं तर, ‘रामायण’ सिनेमा 2 भागांमध्ये प्रदर्शित होणार असून दुसरा भाग 2028 मध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागाची शुटिंग देखील सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता प्रेक्षक दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us