रणबीरच्या ‘रामायण’मध्ये सर्वात मोठी चूक? ज्यामुळे प्रभू राम-रावण युद्ध झालं, तोच महत्त्वाचा प्रसंग गायब!

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असलेल्या रामायण भाग1 मधील एका प्रसंगावरून प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रामायणातील अत्यंत महत्त्वाची घटना असलेले सीताहरण चित्रपटात नेमके कसे दाखवले आहे?

रणबीरच्या रामायणमध्ये सर्वात मोठी चूक? ज्यामुळे प्रभू राम-रावण युद्ध झालं, तोच महत्त्वाचा प्रसंग गायब!
Ramayana Part 1
Image Credit source: social media
| Updated on: Nov 06, 2026 | 6:57 PM

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुप्रतीक्षित आणि तब्बल ४००० कोटींहून अधिक बजेट असलेला ‘रामायण भाग १’ हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये धडकला आहे. रणबीर कपूरची राम, साई पल्लवीची सीता आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यशची रावणाच्या भूमिकेतील एन्ट्री, भव्य व्हीएफएक्स  यामुळे प्रेक्षक थक्क झाले आहेत. मात्र, सिनेमा पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांनी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगावरून नाराजी व्यक्त केली आहे. रामायणातील सर्वात मुख्य वळण मानला जाणारा सीताहरणाचा प्रसंग चित्रपटात अपेक्षेप्रमाणे सविस्तर न दाखवल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

सीताहरणाचा सीन कसा दाखवला?

चित्रपटात रावण सोन्याच्या हरणाचा कपटपट रचून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाला आश्रमापासून दूर पाठवतो. त्यानंतर भिक्षुकाचा वेश धारण करून तो आश्रमात प्रवेश करतो आणि सीतेचे अपहरण करतो. पुढे जटायूच्या संघर्षाचे काही संदर्भ पाहायला मिळतात. परंतु, रामानंद सागर यांच्या जुन्या ‘रामायण’ मालिकेत ज्या पार्श्वभूमीवर, कपट, सीतेचा संघर्ष आणि जटायूचे युद्ध ज्या प्रभावीपणे दाखवले गेले होते, तसे सविस्तर दृश्य या भव्यपटात पाहायला मिळालेले नाही. उलट, याच अपूर्ण प्रसंगावर चित्रपटाचा पहिला भाग संपवण्यात आला आहे.

Loading...

नेटकऱ्यांचा संताप अन् रामानंद सागर यांच्या मालिकेची आठवण

इतक्या प्रचंड बजेटच्या चित्रपटात रामायणाचा ‘आत्मा’ असलेला प्रसंग इतक्या घाईघाईत किंवा संक्षिप्त स्वरूपात का आटोपला? असा थेट सवाल प्रेक्षक करत आहेत. टीव्ही मालिकांमध्येही हा प्रसंग अंगावर काटा आणणारा ठरला होता, मग चित्रपटात त्याला पुरेसा वेळ का दिला गेला नाही, यावरून नेटकऱ्यांनी नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रामायणाची कथा माहीत असलेल्या प्रेक्षकांसाठी सीताहरण हा केवळ एक प्रसंग नाही, तर संपूर्ण कथेला कलाटणी देणारी महत्त्वाची घटना आहे. याच घटनेनंतर प्रभू श्रीराम सीतेच्या शोधासाठी निघतात आणि पुढे रावणासोबतच्या युद्धाची पार्श्वभूमी तयार होते. त्यामुळे या प्रसंगाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे, रामानंद सागर यांच्या मालिकेतील सीताहरणाचे दृश्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे नव्या चित्रपटातील मांडणीची तुलना जुन्या मालिकेशी केली जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us